हरविलेले साडेसतरा लाखांचे १०२ मोबाईल हस्तगत करण्यात यश
काशिमिरा पोलिसांची कारवाई; मोबाईल मूळ मालकांना परत करणार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ मार्च २०२४
मुंबई, – हरविलेले सुमारे साडेसतरा लाख रुपयांचे १०२ मोबाईल हस्तगत करण्यात काशिमिरा पोलिसांना यश आले आहे. गेल्या काही महिन्यांत काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीसह मिसिंग होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. या वाढत्या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत काशिमिरा पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी सीईआयआर पोर्टलवर मिसिंग मोबाईलची माहिती अपलोड केली होती. त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन काशिमिरा पोलिसांच्या विशेष पथकाने गेल्या पाच महिन्यांत हरविलेले १०२ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. या मोबाईलची किंमत १७ लाख ५५ हजार रुपये इतकी आहे. ते मोबाईल लवकरच त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात येणार आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार मराठे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे व त्यांचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश इगवे, अनिल पवार, पोलीस हवालदार दिपक वारे, प्रताप पाचुंदे, राहुल सोनकांबळे, निलेश शिंदे, निकम, पोलीस शिपाई रवी कांबळे, प्रविण टोवरे, किरण विरकर, राजेंद्र सूर्यवंशी, जयप्रकाश जाधव यांनी केली.