मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 सप्टेंबर 2025
मुंबई, – घरासमोर गल्लीत खेळणार्या दोन अल्पवयीन मुलांना फटाके देतो असे सांगून घरी आणून त्यांच्यावर त्यांच्याच परिचित आरोपीने अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 30 वर्षांच्या आरोपीस खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
33 वर्षांची तक्रारदार महिला ही वांद्रे परिसरात राहत असून घरकाम करते. सहा वर्षांचा बळीत तिचा मुलगा आहे. सोमवारी रात्री आठ वाजता तिचा मुलगा व त्याचा मित्र घरासमोरील गल्लीत खेळत होते. यावेळी तिथे आरोपी आला होता. या दोघांनाही फटाके देतो असे सांगून त्याने त्याच्या घरी आणले होते. ते दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती असताना त्याने घरी आणल्यानंतर दोन्ही मुलांचे कपडे काढून त्यांच्याशी अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. या घटनेनंतर त्याने दोन्ही मुलांना हा प्रकार कोणालाही सांगू नका, नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर ते दोघेही प्रचंड घाबरले आणि घरी आले.
घरी आल्यानंतर बळीत मुलाने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला होता. मुलाकडून ही माहिती समजताच तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने मुलाच्या अल्पवयीन मित्राकडे चौकशी केली होती. त्यानेही तीच माहिती तिला दिली होती. या दोघांकडून मिळालेल्या माहितीनंतर तिने खेरवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीला काही तासांत पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मुलांना फटाके देतो असे सांगून घरी आणले आणि दोन्ही मुलांवर अत्याचार केल्याची कबुली दिली.
या कबुलीनंतर त्याला पोलिसांनीी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही मुलांची लवकरच मेडीकल होणार आहे. बळीत दोन्ही मुले आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले.