किडनी विक्रीतून एक कोटी देतो सांगून ऑनलाईन फसवणुक

प्रोसेस फीसाठी तीन लाख घेणार्‍या ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 जुलै 2025
मुंबई, – घरातील आर्थिक चणचणीतून मार्ग काढण्यासाठी एका 45 वर्षांच्या व्यक्तीने स्वतची किडनी विक्रीचे प्रयत्न केला, या व्यक्तीला किडनी विक्रीतून एक कोटी रुपये देतो असे सांगून या ठगाने प्रोसेस फी म्हणून तीन लाख रुपये घेऊन ऑनलाईन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या व्यक्तीच्या तक्रारीवरुन दहिसर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

यातील 45 वर्षांचे तक्रारदार त्याच्या कुटुंबियांसोबत दहिसर येथे राहत असून अंधेरीतील एका खाजगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतो. त्याच्या घरातील आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे स्वतची किडणी विकून काही पैसे मिळतील का यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. याबाबत त्याने सोशल मिडीयावर सर्च करुन माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्याला नवी दिल्लीतील सह्याद्री हॉस्पिटलची माहिती मिळाली होती. या हॉस्पिटलमध्ये किडनी विक्रीतून चांगले पैसे मिळत असल्याचे समजले होते. त्यामुळे त्याने हॉस्पिटलचा मोबाईल क्रमांक काढून तिथे संपर्क साधला होता. यावेळी त्याने समोरील व्यक्तीला किडनी विक्रीबाबत माहिती सांगितली होती. यावेळी या व्यक्तीने त्याची प्राथमिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला.

कोणी इच्छुक व्यक्ती असल्यास त्याला संपर्क साधला जाईल असे सांगण्यात आले. 16 जुलै 2024 रोजी तो त्याच्या बोरिवलीतील कार्यालयात होता. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याला व्हॉटअप कॉल करुन त्याचे नाव, रक्तगट, वय, पत्ता आदी माहिती विचारली होती. त्यामुळे त्याने त्याला सर्व माहिती दिली होती. या व्यक्तीने किडनी विकण्यासाठी त्याला एक कोटी रुपये मिळतील असे सांगून आधी त्याला प्रोसेस म्हणून तीन लाख रुपये भरावे लागतील से सांगितले. मात्र ही रक्कम त्याच्याकडे नसल्याने त्याने त्याला टप्याटप्याने ही रक्कम जमा करा. नाहीतर त्यांना किडनी विकता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे त्याने त्याला दिलेल्या बँक खात्यात तीन लाख रुपये पाठविले होते.

ही रक्कम दिल्यानंतर त्याने किडनीबाबत विचारणा सुरु केली होती. मात्र संबंधित व्यक्ती त्याच्याकडे आणखीन पैशांची मागणी करत होता. यावेळी त्याने त्याला आणखीन पैसे देता नाही असे सांगितले. त्यानंतर या व्यक्तीने काही दिवस त्याला संपर्क साधला नाही. त्यामुळे त्याने सोशल साईटवर सह्याद्री हॉस्पिटलची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला संंबंधित हॉस्पिटल दिल्लीत नसून पुण्यात असल्याचे समजले. किडनी विक्रीतून एक कोटी रुपये मिळून देतो असे सांगून या व्यक्तीने त्याच्याकडे प्रोसेस फी म्हणून तीन लाख रुपये घेऊन त्याची फसवणुक केली होती. त्यामुळे त्याने सायबर क्राईम पोर्टलसह दहिसर पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दहिसर पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ऑनलाईन

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page