मैत्री करुन तृतीयपंथीवर अनैसगिंक लैगिंक अत्याचार करुन फसवणुक
कांदिवलीतील घटना; गुन्हा दाखल होताच मित्राला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ मार्च २०२४
मुंबई, – दहा वर्षांपूर्वी ओळखीतून मैत्री आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर एका तृतीयपंथीवर अनैसगिक लैगिंक करुन त्याची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीसह अनैसगिक लैगिंक अत्याचाराचा गुन्हा नोंद होताच आरोपी मित्राला कांदिवली पोलिसांनी अटक केली. ओंकार जितेंद्र इंगले असे या ३० वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. ओंकारने गुपचूप करुन आपली फसवणुक केल्याचे लक्षात येताच या तृतीयपंथीने त्याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार तृतीयपंथी कांदिवलीतील गणेशनगर परिसरात तर आरोपी ओंकार हा गोरेगाव येथे राहतो. त्यावेळेस तो एका खाजगी कंपनीत कामाला होता. दहा वर्षांपूर्वी गोरेगाव येथील एका नवरात्रोत्सावात या दोघांची ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. मैत्रीचे नंतर प्रेमात रुपांतर झाले होते. याच दरम्यान त्यांच्या शारीरिक संबंध आले होते. अनेकदा ओंकारने त्याच्या मनाविरुद्ध त्याच्यावर अनैसगिक लैगिंक अत्याचार केले होते. आर्थिक चणचण असल्याचे तो त्याच्याकडून सतत पैशांची मागणी करत होता. पिडीत तृतीयपंथीही त्याला पैशांची मदत करत होता. काही महिन्यांपूर्वी ओंकारने एका तरुणीशी लग्न केले होते. या लग्नाबाबत पिडीताला काहीच माहिती नव्हती. काही दिवसांपूर्वीच त्याला ओंकारने लग्न केल्याची माहिती समजली होती. ही माहिती समजल्यानंतर त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. याच कारणावरुन त्यांच्यात खटके उडू लागले होते. आपला विश्वासघात करुन ओंकारने लग्न केल्याने त्याला त्याचा प्रचंड राग आला होता. त्यामुळे त्याने त्याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ओंकारविरुद्ध पोलिसांनी अनैसगिंक लैगिंक अत्याचार फसवणुक, मारहाण करुन शिवीगाळ करणे या कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत त्याला चार दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपीने पिडीताशी सहा वर्षांपूर्वी वांद्रे फॅमिली कोर्टात रजिस्ट्रर लग्न केले होते. त्यानंतर ते दोघेही एकत्र राहत होते. याच दरम्यान आरोपीने दुसर्या तरुणीशी लग्न केले होते. हा प्रकार समजल्यानंतर त्यांच्यात वाद झाला आणि प्रकरण पोलीस ठाण्यात आल्याचे बोलले जाते. याबाबत पोलिसांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला.