वयोवृद्ध महिलेची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयतन

कुठलाही पुरावा नसताना सहा दिवसांत हत्येचा पर्दाफाश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ जून २०२४
कोल्हापूर, – सहा दिवसांपूर्वी जयसिंगपूरच्या कवठेसार, शिरोळ गावच्या वारणा नदीत सापडलेल्या एका ६४ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट केल्याच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला यश आले आहे. कुठलाही पुरावा नसताना पोलिसानी मृत महिलेच्या भाच्यासह मित्राला अटक केली आहे. प्रकाश सोमाप्पा चव्हाण आणि राजू वालाप्पा नायक अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मृत महिलेचे नाव जरीना बेगम मोहम्मद युसूफ खान असून तिच्या आजाराला कंटाळून तसेच तिच्याकडील पैसे हडप करण्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आल्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सांगितले.

२१ जूनला जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवठेसार, शिरोळ गावच्या हद्दीतील वारणा नदीत स्थानिक पोलिसांना एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह बारदानाच्या पोत्या बांधून फेंकून देण्यात आला होता. पाण्यामुळे मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे मृत महिलेची ओळख पटली नव्हती. पंचनामा केल्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. प्राथमिक तपासात या महिलेची हत्या करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मारेकर्‍यांनी तो नदीत फेंकून पलायन केले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ही माहिती मिळताच पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिक्षक रोहिणी साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करुन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे, पोलीस अंमलदार प्रकाश पाटील, सतीश जंगम, प्रशांत कांबळे, संजय इंगवले, अमीत सर्जे, महेश खोत, राजेंद्र कांबळे, रफिक आवळकर, यशवंत कुंभार, आयुब गडकरी, संजय पडवळ, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अमोल अवघडे, गावभाग पोलीस ठाण्याचे शिवानंद पाटील, जयदीप बागडे, सायबर पोलीस ठाण्याचे विक्रम पाटील यांनी संयुक्तपणे तपास सुरु केला होता.

मृत महिलेची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. याच प्रयत्नात असताना पोलिसांना चंदूर येथील एक मुस्लिम वयोवृद्ध महिला गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मिसिंग असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे जाऊन चौकशी केली असता तिचे नाव जरीना बेगम असल्याचे उघडकीस आले. ती बागलकोट, शिवाली, राठोडची रहिवाशी होती. ती तिच्या वडिलांसोबत हातकणंगले परिसरात राहत होती. २० वर्षापूर्वी तिचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर ती मुंबईत आली होती. नागपाडा परिसरात राहत असताना अडीच वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर तिच्या मालकी हक्काच्या घरावरुन तिचे पतीच्या नातेवाईकांसोबत वाद सुरु होता. तिला मूलबाळ नसल्याने ते तिचा मानसिक त्रास देत होते. ही माहिती तिने तिच्या बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण याा सांगितली होती. नातेवाईकांकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून तिने तिचे घर विकले होते. त्यातून तिला २८ लाख रुपये मिळाले होते. त्यानंतर ती गेल्या एक वर्षांपासून प्रकाशसोबत राहत होती. जरीनाला त्वचारोग होता. ती घरात कुठेही घाण करत होती. त्याचा त्याला प्रचंड त्रास होत होता. मात्र तिच्याकडे असलेल्या पैशांमुळे तो तिला काहीच बोलत नव्हता. तिची हत्या केल्यास तिच्यापासून होणारा त्रास संपेल आणि तिचे पैसे आपल्याला मिळतील या उद्देशाने त्याने तिच्या हत्येची योजना बनविली होती.

ठरल्याप्रमाणे ११ जूनला त्याने तिला जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर झोपेतच त्याने तिची गळा आवळून हत्या केली होती. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने त्याचा मित्र राजू नायक याची मदत घेतली होती. बारदान्याच्या गोणीत तिचा मृतदेह टाकून ते दोघेही बाईकवरुन नदीजवळ आले. तिथे त्यांनी मृतदेह टाकून हत्येचा पुरावा नष्ट करुन पलायन केले होते. तपासात ही माहिती उघडकीस येताच प्रकाश चव्हाण आणि राजू बालाप्पा नायक या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच जरीना बेगमची हत्या करुन तिचा मृतदेह नदीत फेंकून पुरावा नष्ट केल्याची कबुली दिली. तिच्या हत्येनंतर त्यांनी तिचे साडेचौदा लाख रुपये स्वतकडे घेतले होते. ही रक्कम आणि गुन्ह्यांतील बाईक पोलिसांनी हस्तगत केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी जयसिंगपूर पोलिसांकडे सोपविण्यात आले. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्याविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page