प्रॉपटीच्या वादातून चांदीच्या व्यापार्‍याची भावाकडून हत्या

भावासह दोघांना चोरीच्या मुद्देामालासह १२ तासांत अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ सप्टेंबर २०२४
कोल्हापूर, – रॉबरीचे चित्र निर्माण करुन प्रॉपटीच्या वादातून ब्रम्हनाथ सुकुमार हालुंडे या २९ वर्षांच्या चांदीच्या व्यापार्‍याची त्यांच्याच सख्ख्या भावाने त्याच्या मित्राच्या मदतीने घरात घुसून तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली. या हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपी भावासह दोन्ही आरोपींना अवघ्या बारा तासांत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली. प्रविण सुकुमार हालुंडे आणि आनंद शिवाजी खेमलापुरे अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही पुढील चौकशीसाठी गोकुळ शिरगांव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यांतील चोरीचे चांदी आणि बाईक हस्तगत करण्यात आले आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ब्रम्हनाथ हालुंडे हे चांदीचे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कोल्हापूरच्या गोकुळ शिरगांव, पंचतारांकित एमआयडीसी परिसरात राहतात. २२ सप्टेंबरला सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी घुसून अज्ञात व्यक्तींनी त्यांची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. हत्येनंतर मारेकरी त्यांच्याकडील चांदी घेऊन पळून गेले होते. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात रॉबरीसह हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. हा तपास सुरु असतानाच मृत ब्रम्हनाथ व त्याचा लहान भाऊ प्रविण सुकुमार हालुंडे यांच्यात वडिलोपोर्जित प्रॉपटीवरुन वाद सुरु होता. हाच धागा पकडून पोलिसांनी प्रविणला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सुरुवातीला त्याने चौकशीत सहकार्य केले नाही. मात्र पोलिसी इंगा दाखविताच त्यानेच त्याच्या मित्राच्या मदतीने त्याच्या भावाची हत्या केल्याची कबुली दिली. ब्रम्हनाथ हा घरात कोणाचेही ऐकत नव्हता. वडिलोपार्जित चांदीचा व्यवसाय त्याने स्वतकडे ठेवून इतरांना त्यांचा हिस्सा देत नव्हता. त्यांच्या व्यवसायात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे प्रविणला त्याचा मोठा भाऊ ब्रम्हनाथविषयी प्रचंड राग होता. त्यामुळे त्याने त्याचा मित्र आनंद खेमलापुरे याच्या मदतीने भावाच्या हत्येची योजना बनविली होती.

२२ सप्टेंबरला प्रॉपटीवरुन ब्रम्हनाथ आणि प्रविण यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीतून त्याने आनंदच्या मदतीने त्याची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. हत्येतील घरातील सर्व चांदीसह दागिने घेऊन ते दोघेही पळून गेले होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून प्रविण तिथे थांबला होता तर त्याने आनंदला कर्नाटक येथे पाठविले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर प्रविणला पोलिसांनी अटक केली तर आनंदला कर्नाटकच्या रायबाग परिसरातून पोलिसांनी अटक केली. हत्येचा गुन्हा दाखल होताच अवघ्या बारा तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी हत्येचा पर्दाफाश करुन दोन्ही आरोपींना चोरीच्या मुद्देमाल आणि बाईकसह अटक केली.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर, पोलीस उपअधिक्षक आनंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड, हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चोखंडे, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, प्रसाद कोळपे, पोलीस अंमलदार संजय हुंबे, कुष्णात पिंगळे, निवृत्ती माळी, वसंत पिंगळे, हिंदुराव केसरे, प्रकाश पाटील, महेंद्र कोरंबी, विनायक चौगुले, विशाल खराडे, लखन पाटील, शांतीराम तळपे, समीर कांबळे, नितेश कांबळे, अमीत सर्जे, राजेंद्र बरांडेकर यांनी केली

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page