मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ डिसेंबर २०२४
मुंबई, – सरकारी योजनेच्या नावाखाली ठगाने वृद्ध महिलेचे दागिने घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
३१ डिसेंबर २०२४
मुंबई, – सरकारी योजनेच्या नावाखाली ठगाने वृद्ध महिलेचे दागिने घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
वृद्ध महिला या मालाड येथे राहतात. त्या नियमित मालाड येथील मंदिरात जातात. रविवारी त्या नेहमी प्रमाणे मंदिरात गेल्या होत्या. दर्शन झाल्यावर त्या बसल्या. तेव्हा एक महिला त्याच्याकडे आली. तिने वृद्ध महिलेला प्रसादाचा पेढा देते सांगून तिला मंदिराच्या बाहेर आणले. तिने वृद्ध महिलेला रिक्षात बसवून शांताराम तलाव येथे आणले. तेथे गेल्यावर तिने टॅक्सीत बसल्यावर प्रसादाचा पेढा देते असे भासवले. त्यावर विश्वास ठेऊन वृद्ध महिला टॅक्सीत बसली.
टॅक्सी माहीमच्या दिशेने घेण्यास सांगितली. टॅक्सीत बसल्यावर तिने वृद्ध महिलांसाठी योजना असल्याचे सांगितले. वृद्धांना ६० हजार रुपये मिळतात अशा भूलथापा मारल्या. त्यासाठी तुमचा फोटो काढावा लागेल. फोटो काढण्यासाठी अंगावरील दागिने काढून ठेवा अशी सूचना तिने केली. त्यावर विश्वास ठेऊन तिने दागिने काढून ठेवले. टॅक्सी दादर परिसरात आली. तेथे त्या दोघी उतरल्या. ठग महिलेने वृद्ध महिलेला काही अंतर चालत आणले. काम करून दोन मिनिटात येते सांगून ती निघून गेली. बराच वेळ झाल्यावर ती महिला तेथे आली नाही. वृद्ध महिलेने याची माहिती एका दुकानदाराला दिली. त्या दुकानदाराने वृद्ध महिलेच्या मुलाला फोन करून दादर परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर महिलेने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.