जिवदानी मंदिरात भांगेत कुंकू भरुन मंगळसूत्र घालून लग्न केले
अल्पवयीन प्रेयसीवरील लैगिंक अत्याचारप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावरची ओळख…… ओळखीचे रुपांतर प्रेमात…… एखाद्या हिंदी चित्रपटात अभिनेता अभिनेत्रीला मंदिरात नेऊन तिच्या भांगेत कुंकू लावून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून लग्न केल्याचे दाखवले जाते. तशीच मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात घडली. प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला विरारच्या जीवदानी मंदिरात नेले. तिथे जास्त गर्दी नसल्याचा फायदा घेऊन तिच्या भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घातले. देवीच्या गाभार्यात उभे राहून पती-पत्नी असल्याचे भासवून त्याने तिचे लैगिंक शोषण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला प्रेययीने नकार दिला, मात्र तो तिच्यावर आपले लग्न झाल्याचे सांगून जबदस्ती करायचा. त्यातून ती चार महिन्यांची गरोदर राहिली. तिने ही माहिती त्याला दिली, मात्र तिची साथ सोडून प्रियकर त्याच्या बिहारच्या गावी पळून गेला. दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आलेल्या या घटनेने मालाड परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकराविरुद्ध कुरार पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत मुलगी मालाड परिसरात राहते. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत तिची आरोपीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याच दरम्यान त्याला तिला फिरायला जाण्याचा बहाणा करुन विरार येथील जिवदानी मंदिरात आणले होते. मंदिरात कोणीही नसताना त्याने तिच्या भांगात कुंकू भरले आणि मंगळसूंत्र घातले होते. त्यानंतर त्याने तिला त्यांचे लग्न झाल्याचे सांगून तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिने त्यास नकार दिला, मात्र त्याने तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. आगामी काळात काहीही झाले तरी आपण दोघेही सामोरे जाऊ असे तो तिला सांगत होता. याच संबंधातून ती चार महिन्यांची गरोदर राहिली होती. ही माहिती तिने त्याला सांगितली. त्यानतर तो तिला काहीही न सांगता त्याच्या बिहार येथील गावी पळून गेला होता.
तो गावी गेल्याचे समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्याने जिवदानी मंदिरात लग्न केल्याचे भासवून तिच्याशी जबदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर होण्यास प्रवृत्त केले. त्याच्याकडून तिची फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी प्रियकराविरुद्घ तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो बिहारला पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी कुरार पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच बिहारला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.