मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ डिसेंबर २०२४
मुबई, – काम करताना ग्राइंडरचा शॉक लागल्याने आणि लिफ्ट साठी बनवलेल्या डक मध्ये पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रल्हाद पाटील आणि विजय कुमार यादव अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी भांडुप आणि नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
पहिली घटना भांडुप येथे घडली. विजय हा भांडुप येथील एका प्लास्टिकचे पाईप बनवणाऱ्या कंपनीत काम करत होता. मंगळवारी रात्री विजयच्या कंपनीत काम करणाऱ्या एका ग्रॅन्डर मशीन ऑपरेटरने विजय च्या भावाला फोन केला. ग्रॅण्डर मशीनचा शॉक लागल्याने विजय जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्याला मुलुंड येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच भांडुप पोलीस घटनास्थळी आले. विजयच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद केला.
तर दुसरी घटना नेहरूनगर येथे घडली. प्रल्हाद हे दिवा येथे राहत होते. त्याना कुर्ला येथील एका सोसायटीमध्ये काम मिळाले होते. गेल्या आठवड्यापासून प्रल्हाद तेथे कामासाठी जात होते. बुधवारी प्रल्हाद हे नेहमी प्रमाणे कामावर गेले. सायंकाळी त्याच्या पत्नीला एकाने फोन करून प्रल्हाद च्या अपघाती मृत्यूची माहिती दिली. बुधवारी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत टाईल्स नेण्याचे काम केले. काही वेळाने तेथे कंत्राटदार आले. दुपारी प्रल्हाद आणि यादव नावाचा कामगार हे तिसऱ्या मजल्यावर टाईल्स मोजत होते. प्रल्हाद हे टाइल मोजत लिफ्ट साठी राखुन ठेवलेल्या डकच्या दिशेने जात होते. तिसऱ्या मजल्यावरील डक मधून ते खाली पडल्याने जखमी झाले. प्रल्हाद ला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्रल्हादला मृत घोषित केले. त्या डक भवती कोणतीही सुरक्षा साधने नव्हती. या घटनेची माहिती समजताच नेहरू नगर पोलीस घटनास्थळी गेले. प्रल्हादच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.