विक्री केलेल्या फ्लॅटवर कर्ज घेऊन व्यावसायिकाची फसवणुक

काळाचौकीतील घटना आरोपी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – पाच वर्षापूर्वी विक्री केलेल्या फ्लॅटवर कर्ज घेऊन एका इंटेरियल डिझायनर व्यावसायिकाची पती-पत्नीने सुमारे वीस लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. राकेश रामचंद्र सावंत आणि श्रद्धा राकेश सावंत अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्यवसायाने इंटिरियर डिझायनर असलेले लक्ष्मण वर्दीचंद परिहार हे काळाचौकी येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. एक वर्षांपूर्वी त्यांच्या कॉमन मित्रांमार्फत त्यांची सावंत कुटुंबियांशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्या कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. गेल्या वर्षी मे महिन्यांत राकेश व श्रद्धा या दोघांनी त्यांची भेट घेऊन त्यांची आर्थिक अडचण असल्याचे सांगून त्यांच्याकडे वीस लाखांच्या कर्जाची मागणी केली होती. त्यामोबदल्यात त्यांचा चुन्नाभट्टी येथील आंबेवाडी, विनाकल हाईट्स इमारतीच्या विसाव्या मजल्यावरील फ्लॅट तारण ठेवण्याची तयारी दर्शविली होती. सहा महिन्यांत कर्जाची रक्कम दिली नाहीतर त्यांचे फ्लॅट देण्याचे मान्य केले होते. राकेश आणि श्रद्धा यांच्यासोबत कौटुंबिक संबंध असल्याने त्यांनी त्यांना जून २०२३ रोजी वीस लाख रुपये कर्ज स्वरुपात दिले होते. याबाबत त्यांच्यात एम एमओयू बनविण्यात आला होता.

ही रक्कम दिल्यांनतर त्यांनी फ्लॅटचा ताबा तसेच कागदपत्रे देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांनी फ्लॅटचा ताबा किंवा कागदपत्रे दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे कर्जाने दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी त्यांना पाच लाखांचा एक धनादेश दिला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्यामुे लक्ष्मण परिहार यांनी त्यांना त्यांच्या वकिलामार्फत एक नोटीस पाठविली होती. मात्र या नोटीसला त्यांनी काही उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांनी चुन्नाभट्टी येथील त्यांच्या फ्लॅटबाबात चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांना पिनाकल हाईट्सचा विसाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २००१ हा सावंत पती-पत्नीने २०१९ सालीच एका व्यक्तीला विक्री केला होता.

संबंधित व्यक्तीचे कुटुंबिय तिथे राहत होते. फसवणुकीच्या उद्देशाने पाच वर्षांपूर्वी विक्री केलेला फ्लॅट तारण ठेवण्याचे आश्‍वासन देत सावंत पती-पत्नीने वीस लाखांचे कर्ज घेऊन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच लक्ष्मण परिहार यांनी काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राकेश सावंत आणि श्रद्धा सावंत या दोघांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page