सरन्यायाधिशांवरील हल्ल्यानंतर न्यायालयीन कर्मचार्याकडून निषेध
मुंबईसह नाशिक तसेच इतर ठिकाणी निषेध सभांना प्रचंड प्रतिसाद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सर्वोच्च न्यायालयाचे भारताचे सरन्यायाधिश भूषण आर गवई यांच्या दिशेने बूट भिरकावण्याच्या प्रयत्नाने संपूर्ण देशभरात संतप्त पडसाद उमटले आहे. घडलेल्या प्रकाराचा मुंबईसह राज्यातील विविध न्यायालयीन कर्मचार्यांनी निषेध व्यक्त केला होता. मुंबईसह नाशिक व इतर ठिकाणी निषेध सभांना न्यायालयीन कर्मचार्यांनी उत्सूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश बी. आर गवई यांच्या दिशेने राकेश तिवारी नावाच्या एका वकिलाने बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने तिथे उपस्थित वकिलांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर राकेश तिवारीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या घटनेचे सर्वत्र संतप्त पडसाद उमले होते. महाराष्ट्र राज्य न्यायालय कर्मचारी महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय, त्यांच्या अधिपत्याखालील न्याय दंडाधिकारी न्यायालय तसेच लघुवाद न्यायालय मुंबईमधील कर्मचार्यांनी तसेच महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयातील कर्मचार्यांनी सोमवारी झालेल्या आदरणीय सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यावरील अयशस्वी हल्ल्याबाबत निषेध नोंदविला. या निषेध सभांना कर्मचार्यांनी उत्सफूर्तपणे प्रतिसाद दिला. तसेच या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. हा हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेवरील हल्ला असे मानून भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून योग्य ती उपाययोजना करावी अशी विनंती या सभांमधून कर्मचार्यांनी केली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिगंबर निकम, कार्याध्यक्ष नागेश गिरगावकर, सरचिटणीस विनोद पाथरकर तसेच मुंबईमधून मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय शेलार, उपाध्याक्ष रहमान मुकादम, सचिन किरण कांबळे, लघुवाद न्यायालयाचे पदाधिकारी अमोल साळवे, शहर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई या संघटनेचे अध्यक्ष सतीश मुंडे, राजपूत पाटील आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले होते.
या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईसह नाशिक जिल्हा सर्व पदाचे न्यायालयीन कर्मचार्यांनी निषेध नोंदविला होता. यावेळी निषेध सभांमध्ये मोठ्या प्रमाणात न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.