लोकल प्रवासादरम्यानम महिलेची वयोवृद्धाकडून विनयभंग

दादर-मुलुंडदरम्यानची घटना; वयोवृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 फेब्रुवारी 2026
मुंबई, – महिलांच्या डब्ब्यातून लोकल प्रवासादरम्यान एका महिलेचा अपंग डब्ब्यातून प्रवास करणार्‍या एका वयोवृद्धाने अश्लील इशारे करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दादर-मुलुंडदरम्यान घडल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी या महिलेच्या तक्रार अर्जावरुन ठाणे रेल्वे पोलिसांनी अज्ञात वयोवृद्धाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलुंड रेल्वे स्थानकातून पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने वयोवृद्ध आरोपीचा शोध सुरु आहे. दरम्यान या गुन्ह्यांचा तपास कुर्ला रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी दुजोरा दिला आहे.

तक्रारदार महिला ही मंगळवारी दादर रेल्वे स्थानकात आली होती. तिला ठाण्याला जायचे होते, त्यामुळे ती ठाण्याला जाणार्‍या लोकलच्या महिलांच्या डब्ब्यात चढली होती. या डब्ब्याच्या शेजारीच अपंगाचा डब्बा होता. लोकलमध्ये ही महिला तिचा मोबाईल पाहत होती. मुलुंड रेल्वे स्थानक येण्यापूर्वी तिची नजर अपंगाच्या डब्ब्यात गेली होती. यावेळी तिथे वयोवृद्ध आरोपी उभा होता. तिला पाहून तो अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. ही लोकल मुलुंड रेल्वे स्थानकात येताच तिने अपंगाच्या डब्ब्यात जाऊन आरोपीचा शोध घेतला होता, मात्र तो तेथून पळून गेला होता.

काही वेळानंतर ती ठाणे रेल्वे स्थानकात उतरली आणि तिने रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्घ तक्रार केली होती. तिच्या तक्रारीची रेल्वे पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार दादर-मुलुंड रेल्वे स्थानकात घडला होता. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास नंतर कुर्ला रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच कुर्ला रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

आरोपी मुलुंड रेल्वे स्थानकात उतरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गर्दीचा फायदा घेऊन तो पळून गेल्याने त्याची ओळख पटविण्याासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी दुजोरा दिला आहे. आरोपी पळून गेल्याने त्याचा शोध सुरु आहे. या गुन्ह्यांत त्याला लवकरच अटक केली जाईल असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page