यूट्यूबर रणवीर अलाहाबादियासह ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र सायबरकडून सर्वांची चौकशी करुन जबानी नोंदविणार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – समय रैना यांच्या लोकप्रिय यूट्यूब रिअलिटी शो इंडिया गॉट लेटेंड कार्यक्रमाच्या माध्यमातून वादग्रस्त आणि आक्षेपार्ह टिका केल्याप्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या अडचणीत चांगलीव वाढ झाली आहे. त्याच्यासह इतर ३० जणांविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्वांची लवकरच पोलिसांकडून चौकशी केली जाणार असून त्यांची जबानी नोंदविली जाणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

रणवीर अलाहाबादिया हा सोशल मिडीयावर प्रचंड लोकप्रिय असून एक्सवर त्याचे सहा लाख, इंटाग्रामवर साडेचार दशलक्ष फॉलोअर्स आहे. त्याचा स्वतचा यूट्युूब चॅनेल असून त्याचे साडेदहा दशलक्ष सबस्क्राबर्स आहेत. त्याच्या आक्षेपार्ह विधानानंतर सोशल मिडीयावर त्याला सर्वात जास्त टार्गेट केले आहे. काही दिवसांपूर्वी कॉमेडियन समन रैना याने त्याच्या इंडिया गॉट लेटेंट या कार्यक्रमांत यूट्यूबर आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा आणि रणवीर अलाहाबादिया यांना निमंत्रण दिले होते. या कार्यक्रमांक पाहुणा म्हणून आलेल्या रणवीरने काही आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर सोशल मिडीयावर प्रचंड टिका झाली होती. हा प्रकार लक्षात येताच रणवीरकडून जाहीर माफी मागण्यात आली होती. मात्र माफी मागूनही त्याच्यावर सोशल मिडीयावर टिका सुरुच होती. त्याच्या या विधानाची काही वकिलांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध खार पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर खार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.

हा तपास सुरु असताना आता महाराष्ट्र सायबर विभागात रणवीर अलाहाबादियासह इतर ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यांचा सायबर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला असून लवकरच संबंधितांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्यांची जबानी नोंदवून नंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आक्षेपार्ह आणि वादग्रस्त टिका करणे रणवीर चांगले महागात पडले असून त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page