महादेव बेटींग ऍपप्रकरणी तिसर्‍या मुख्य आरोपीस अटक

गुजरात पोलिसांकडून घेतला ताबा; पाच दिवसांची कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पंधरा हजार कोटीचा महादेव बेटींग ऍप प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच दुबईला पळून गेलेला आणि लुक आऊट नोटीस बजाविण्यात आलेल्या तिसर्‍या मुख्य आरोपीस मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अटक केली. भरत चौधरी असे या आरोपीचे नाव असून त्याचा गुजरात पोलिसांकडून ताबा घेण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

महादेव बेटींग ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन बेटींग घेऊन कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा झाला होता. या ऍपच्या मदतीने काही आरोपींनी सुमारे पंधरा हजार कोटीची फसवणुक केली होती. ही रक्कम काही बेनामी खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. या कटातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे दुबईहून हा संपूर्ण व्यवहार हाताळत होते. त्यांच्या मदतीला भरत चौधरी हादेखील होता. ऍपशी संबंधित सर्व तांत्रिक बाबीची जबाबदारी भरत चोधरीवर होती. हा प्रकार संपूर्ण उघडकीस आल्यानंतर महादेव बेटींग अँपशी संबंधित ३२ जणांविरुद्ध माटुंगा पोलीस ठाण्यात भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांची देश-विदेशात व्याप्ती असल्याने त्याचा तपासासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे गुन्हा दाखल होताच विशेष तपास पथकाकडून तपास सुरु करण्यात आला होता. त्यानंतर या पथकाने मिरारोड येथून दिक्षीत कोठारीला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर छत्तीसगढ येथून बॉलीवूड अभिनेता साहिल खान याला पोलिसांनी अटक केली होती.

त्यांच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर विदेशात वास्तव्यास असलेल्या काही आरोपीविरुद्ध लुक आऊट नोटीस बजाविण्यात आली होती. त्यात भरत चौधरीचा समावेश होता. २३ जुलैला त्याला गुजरातच्या पाटण येथून कच्छ पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडत होता. त्याचा ताबा आता मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने घेतला आहे. भरत हा या कटातील मुख्य आरोपी असून तो ऍप आणि ऍपशी संबंधित प्लेफॉर्मशी तांत्रिक समस्या सोडविण्यात मदत करत होता. त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page