महापरिनिर्वाणदिनानिमित्त मोफत कायदेशीर सल्ल्याचे आयोजन
मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समितीला प्रचंड प्रतिसाद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० डिसेंबर २०२४
मुंबई, – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सवाच्या वतीने मोफत कायदेशीर सल्ल्याचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनाला अनेकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रमुख सल्लागार चंद्रकांत बनकर यांनी सांगितले. यावेळी सात हजार अनुयायांना मोफत अल्पोपहार देण्यात आला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सवाच्या वतीने दरवर्षी नियमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने दादर येथील चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना मोफत कायदेशीर सल्ला देण्यात आला होता. त्याचा अनेकांनी फायदा घेतला होता. त्यामुळे या आयोजनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या स्टॉलचे उदघाटन सकाळी अकरा वाजता बुद्ध वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ ग्रंथाचे संग्रहक आणि अभ्यासक रमेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी संपूर्ण दिवसभर मोफत कायदेशीर देण्याचे काम करण्यात आले. खेड्यापाड्यातून आलेल्या अनुयायांचे ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय येथील समस्या एकूण त्यांचे निराकरण करण्यात आले. वेळप्रसंगी तेथील अधिकार्यांना दूरध्वनी करुन अनुयायांच्या समस्या सोडवल्या जात होत्या. यावेळी सुमारे सात हजार अनुयायांना मोफत अल्पोपहार देण्यात आला.
त्यासाठी सत्र न्यायालय वकिल संघटनेचे अध्यक्ष रवी जाधव, त्यांची टिम, तसेच जिल्हा विधी प्राधिकरण मुंबई अध्यक्ष देशमुख यांचे मौलाचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर या सर्वांचे आयोजन करणारे संघटनेचे अध्यक्ष शरद साळवे, कार्याध्याक्ष रवी पवार, सचिव संजय शेलार, खजिनदार किरण कांबळे, प्रमुख सल्लागार चंद्रकांत बनकर, निलेश तायडे, सचिन हिवराळे, नरेंद्र चौकेदार, प्रशांत दाभाडे, प्रशांत भोसले, दिप्ती कसबे, महेशचंद भामरे व इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी जातीने उपस्थित राहून सर्वांचे मौलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रमुख सल्लागार चंद्रकांत बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले होते तसेच त्यांना इतर सहकार्यांची खूप मदत झाली.