मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – चेंबूर आणि माहीम येथील दोन वेगवेगळ्या घटनेत आठ वर्षांच्या मुलावर अनैसगिंक तर सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर त्यांच्याच परिचित दोघांनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरसीएफ व शाहूनगर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन एका आरोपीस अटक केली तर दुसर्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
२९ वर्षांची तक्रारदार महिला ही परिचारिका असून ती चेंबूर परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला आठ वर्षांचा एक मुलगा आहे. बुधवारी २९ जानेवारीला दुपारी तीन वाजता तो त्याच्या घरासमोरच खेळत होता. यावेळी तिथे त्याचा परिचित आरोपी सोनू हा २६ वर्षांचा तरुण आला होता. त्याने त्याला नवीन पतंग देतो असे सांगून जवळच असलेल्या एका पडक्या घरात आणले. त्यानंतर त्याने त्याच्यावर अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असा दम दिला होता. हा प्रकार नंतर मुलाकडून त्याच्या आईला समजताच तिने सोनूविरुद्ध आरसीएफ पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसर्या घटनेत एका सोळा वर्षांच्या मुलीवर तिच्याच परिचित २० वर्षांच्या तरुणाने लैगिंक अत्याचार केला. ही मुलगी शिक्षण घेत असून सध्या माहीम येथे राहते. काही दिवसांपूर्वी तिची मेहताब शेख या तरुणासोबत सोशल मिडीयावर ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. २६ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत त्याने तिला काम दाखवतो असे सांगून एका फ्लॅटमध्ये आणले. तिथे तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला. तिचे नग्नावस्थेतील काही फोटोसह व्हिडीओ काढले. हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिचे अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करुन तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. जिवासह बदनामीच्या भीतीने सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही नाही. मात्र शनिवारी तिने घडलेला प्रकार शाहूनगर पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.