मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 जून 2025
मुंबई, – व्हिडीओ गेम खेळण्यास देतो असे सांगून सात आणि आठ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना घरात आणून त्यांच्यावर त्यांच्याच परिचित आरोपीने अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना माहीम परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरुन माहीम पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन 37 वर्षांच्या आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
25 वर्षांची तक्रारदार महिला ही माहीम परिसरात राहते. तिला आठ वर्षांचा मुलगा असून दुसरा सात वर्षांचा बळीत मुलगा याच परिसरात राहतो. तिचा मुलगा आणि दुसरा मुलगा हे दोघेही चांगले मित्र आहेत. याच परिसरात आरोपी मोहन हा राहत असून तो काहीच कामधंदा करत नाही. एकाच परिसरात राहत असून तो दोन्ही मुलांच्या परिचित आहे. बुधवारी 18 जून ते गुरुवार 19 जून असे सलग दोन दिवस मोहनने बळीत दोन्ही मुलांना व्हिडीओ गेम खेळण्यास देतो असे सांगून त्याच्या घरी आणले. घरी आल्यांनतर त्याने त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी अश्लील चाळे करुन अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता.
तसेच हा प्रकार कोणालाही सांगून नका अशी धमकी दिली होती. हा प्रकार दोन्ही मुलांकडून तक्रारदार महिलेस समजताच तिने माहीम पोलिसांत मोहनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची तिथे उपस्थित पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच शुक्रवारी सकाळी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.