माहीमच्या नामांकित शाळेच्या चार ट्रस्टीसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल
सीबीएसई बोर्डाची परवानगीसाठी 75 लाखांचा भष्ट्राचार झाल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 नोव्हेंबर 2025
मुंबई, – माहीमच्या एका नामांकित शाळेच्या चार ट्रस्टीसह पाजचणांविरुद्ध माहीम पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय काशिनाथ सुखटनकर, मंगेश नारायण राजाध्यक्ष, अनिल पै. कोकाडे, विनय भगवंत रेगे आणि अनुपमा खेतान अशी या पाचजणांची नावे आहेत. यातील विनय रेगे सरस्वती मंदिर एज्युकेशन सोसायटी ट्रस्टचे अध्यक्ष, संजय सुखटणकर सचिव, मंगेश राजाध्यक्ष सदस्य आहेत. या सर्वांची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ट्रस्टच्या उपाध्याक्षाच्या तक्रारीवरुन हा संपूर्ण भष्ट्राचार उघडकीस आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
71 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मनोहर संजीव कामत हे वैद्यकीय चिकित्सक असून माहीम परिसरात राहतात. 2015 ते 2020 या कालावधीत ते माहीमच्या सेनापती बापट मार्गावरील सरस्वती मंदिर एज्युकेशन ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. या संस्थेत तीन विश्वस्थ, प्रत्येकी एक कार्याध्यक्ष, सचिव, खनिनजदार आणि बारा सदस्य असे कार्यकारणी मंडळ आहेत. गेल्या बारा वर्षांपासून शाळेच्या व्यवस्थापकांनी सीबीएसई विभाग सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शाळेच्या एका इमारतीला सीबीएसईसाठी राखीव ठेवण्यात आले होते. राज्य शासनाच परवानगीनंतर शाळेत सीबीएसई बोर्ड सुरु झाला होता. मात्र त्यासाठी शाळेला बोर्डाची परवानगी घेणे गरजेचे होते. त्यामुळे शाळेकडून संबंधित विभागात पत्रव्यवहार करण्यात आले होते.
शाळेच्या सुविधा बोर्डाच्या अटी आणि शर्तीनुसार नसल्याने सीबीएसई बोर्डकडून ही परवानगी मिळविणे जवळवजवळ अशक्य असल्याचे शाळेच्या व्यवस्थापकाच्या निदर्शनास आले होते. याच दरम्यान ट्रस्टचे सदस्य मंगेश राजाध्यक्ष, मोहन नेरुळकर, अनिल कोकाटे यांनी परिभाषा एज्युकेशन सर्व्हिस व शाश्वत सोल्यूशनच्या प्रोप्रायटर अनुपमा खेतान या सीबीएसई बोर्डाच्या एजंट आहे. त्यांच्यामार्फत शाळेला परवानगी मिळू शकते. गरज पडल्यास संबंधित अधिकार्यांना पैसे देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. त्यास संजय सुखटनकर यांनी होकार दर्शविला होता. ठरल्याप्रमाणे ट्रस्टने अनुपमा खेतान यांना तीस लाखांचा धनादेश देण्याचा निर्णय घेतला होता.
अकाऊंट आणि ऑडिट पूर्ततेसाठी त्यांच्यात एमओयू झाला होता. सहा महिने अनुपमा यांच्या संपर्कात राहून ट्रस्टच्या वतीने सीबीएसई बोर्डासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रे जमा करण्यात आले होते. याच दरम्यान अनुपमा यांनी त्यांच्याकडे अतिरिक्त सेवा म्हणून आणखीन पैशांची मागणी केली होती. त्यात तीस लाखांचा धनादेश आणि पंधरा लाख रुपये कॅश स्वरुपात देण्यास सांगितले होते. त्यामुळे ट्रस्टच्या वतीने त्यांना पुन्हा पैसे देण्यात आले होते. मार्च 2022 साली बोर्डाकडून शाळेच्या ट्रस्टला शाळेचया सीबीएसईसंदर्भातील प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे लेखी स्वरुपात कळविण्यात आले होते. या घटनेनंतर ट्रस्टच्या सर्वच पदाधिकार्यांना धक्का बसला होता.
सीबीएसई बोर्डची मान्यता मिळावी यासाठी ट्रस्टच्या सदस्यांनी अनुमपा खेतान यांना 75 लाख 50 हजार रुपये धनादेश व कॅश स्वरुपात दिले होते. तरीही शाळेला मान्यता मिळाली नव्हती. त्यामुळे या रक्कमेच्या खर्चाबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र आरोपी पदाधिकार्यांकडून कोणतेही समर्पक उत्तर देण्यात आले नाही. या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाला होता. या भष्ट्राचाराची चौकशी करुन दोषीवर कारवाई करणयाची मागणी नवीन संचालक मंडळाकडे करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे मनोहर कामत यांनी माहीम पोलिसांसह धर्मादाय आयुक्त, महानगरपालिका आदी कार्यालयात लेखी अर्जाद्वारे तक्रार करण्यात आली होती.
या तक्रारीनंतर धर्मादाय आयुक्ताकडून चौकशी सुरु करणयात आली होती. त्याचा अहवाल नंतर वरिष्ठांना सादर करण्यात आला होता. या अहवालानंतर संबंधित विभागाला माहीम पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानंतर पोलिसांनी मनोहर कामत यांची तक्रार नोंदवून संंबंधित पाचही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या आरोपींना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.