मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२५
मुंबई, – अटकेची भीती दाखवून ठगाने महिला सीएच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. आठ लाख रुपयाची फसवणूकप्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार या महिला सीए आहेत. त्याच्या आणि त्याच्या आईच्या नावाने बँकेत जॉईट खाते आहे. गेल्या आठवड्यात त्याना एक रेकॉर्ड कॉल आला. टेलिफोन ऑथॉरिटी मधून बोलत असून तुमचा फोन दोन तासांनी बंद होणार असल्याच्या भूलथापा मारल्या. जर प्रतिनिधींशी बोलायचे असल्यास दोन क्रमांक मोबाईलवर प्रेस करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन महिलेने दोन क्रमांक प्रेस केला. ठगाने त्याना अनोळखी नंबर नावावर नोंद असल्याचे तिला सांगितले. तो नंबर आधारकार्ड शी लिंक असून त्या नंबरवर दिल्लीत १७ गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर ठगाने त्याना एक नंबर दिला. तो नंबर दिल्ली सायबर सेलचा असल्याच्या भूलथापा मारल्या.
त्यानंतर त्याना एका नंबरवरून विडिओ कॉल आला. तेव्हा एक जण पोलिसांच्या गणवेशात दिसली. तुमचा फोन सायबर विभागात ट्रान्स्फर करत असल्याचे सांगितले. ठगाने त्याचे नाव सांगून त्या नंबरवर १७ गुन्हे दाखल असल्याचे भासवले. आपण उच्च शिक्षित दिसत आहात, तुम्ही आधारकार्डवर हाताचे ठसे कॉपी करून दुसरा नंबर घेतल्याच्या त्याने भूलथापा मारल्या. तुमच्या बँके खात्याचे सर्व्हिलन्स होत आहे असे सांगून खात्याची माहिती घेतली. ठगाने नोटीस दाखवून तिला तपासात सहकार्य करा असे सांगितले. आम्ही सर्व गुन्हेगारावर नजर ठेवतो अशा त्याने भासवले.
तुमचा आयपी ऍड्रेस ट्रेस करायचा असल्याचे सांगून ठगाने महिलेकडून ८ लाखांची मागणी केली. सुरुवातीला तिने नकार दिला. काही वेळाने त्याना एकाने फोन केला. त्याने तो सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. त्याने महिलेला ताब्यात घ्यावे लागेल अशी भीती दाखवली. भीती दाखल्याने महिलेने ८ लाख खात्यात ट्रान्स्फर केले. त्यानंतर ठगाने महिलेला बोलबचन देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.