आईस्क्रिममध्ये बोटाचा तुकडा सापडल्याने खळबळ

मालाड येथील घटना; युममो कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जून २०२४
मुंबई, – ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रिममध्ये नख असलेला मांसचा तुकडा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी आईस्क्रिम उत्पादक युम्मो कंपनीविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. हा तुकडा फॉन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे. त्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेंडन ऍटिक्स फेरॉव हा २६ वर्षांचा तरुण डॉक्टर असून तो मालाडच्या ऑर्लेम, डॉमनिक रोडच्या प्लेजट सोसायटीमध्ये राहतो. त्याने रशियातून एमडीची पदवी घेतली असून सध्या विलेपार्ले येथील एका नामांकित रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर म्हणून काम करतो. नोकरीसोबत तो पोस्ट ग्रॅजुयेटची परिक्षेची तयारी करत आहे. बुधवारी १२ जूनला त्याची बहिण जेसिकाने जेप्टो या ऑनलाईन ऍपवरुन एक किलो बेसन, तीन युम्मो मॅगो आईस्क्रिमची ऑर्डर केली होती. रात्री जेप्टो कंपनीचा प्रतिनिधी ऑर्डर घेऊन त्यांच्या घर आला होता. यावेळी त्याने बेसनसोत दोन मँगो कोन आईस्क्रिम आणि एक युम्मो बटरस्कॉच कोन आईस्क्रिम आणले होते. बटरस्कॉच कोन आईस्क्रिमची ऑर्डर केली नसताना त्यांना ती पाठविण्यात आली होती. जेवण झाल्यानंतर रात्री पाऊणच्या ते सर्वजण आईस्क्रिम खात होते. यावेळी त्याच्या तोंडामध्ये काहीतरी तुकडा आला म्हणून तो तुकडा तोंडातून हातात घेतला. त्याचे निरीक्षण केले असता त्यात नख असलेला मांसचा तुकडा असल्याचे आढळून आले. ते पाहून त्याला उलटीसारखे होऊ लागले. त्यामुळे त्याने सोशल मिडीयावरुन युम्मो आईस्क्रिम कंपनीच्या पेजवर तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कंपनीच्या कस्टमर केअरमधून त्याला कॉल आला होता. घडलेला प्रकार सांगितल्यानंतर या कर्मचार्‍याने त्याला आईस्क्रिमवरील कंपनीची छातील माहितीचा फोटो आणि ऑर्डर डिटेल्स पाठविण्यास सांगितले. त्यामुळे ती माहिती त्याला पाठवून दिली होती. दहा मिनिटांनी या कर्मचार्‍याने त्याला पुन्हा कॉल करुन त्याच्या तक्रारीची माहिती काढण्याचे काम सुरु असून लवकरच तुम्हाला माहिती दिली जाईल असे सांगितले. नंतर त्याच्याकडून काही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे ते सर्वजण नख असलेला मांसचा तुकडा आईस बॅगमध्ये ठेवून मालाड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आले होते. घडलेला प्रकार सांगून तिथे उपस्थित पोलिसांना सांगून त्याने युम्मो कंपनीसह संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. नख असलेला मांसचा तुकडा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page