दारु पिण्यास नकार दिला म्हणून मित्राची मारहाण करुन हत्या
मालाड येथील घटना; हत्येप्रकरणी आरोपी मित्राला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मार्च २०२४
मुंबई, – दारु पिण्यास नकार दिला म्हणून उत्तम मोतीचंद चोधरी या ३८ वर्षांच्या फळ विक्रेत्याची त्याच्याच मित्राने मारहाण करुन हत्या केल्याची घटना सोमवारी मालाड परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या कृष्णा कमलेशी यादव या आरोपी मित्राला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
सोमवारी दुपारी एक वाजता मालाड येथील आनंद रोड परिसरात एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती मालाड पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे धाव घेऊन या तरुणाला जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू त्याच्याकडे सापडली नव्हती. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या. चौकशीदरम्यान त्याचे नाव उत्तम मोतीचंद चौधरी असल्याचे उघडकीस आले. उत्तम हा तिथे फळ विक्रीचे काम करत होता. त्याचे सकाळी साडेदहा वाजता त्याच्या मद्यपी मित्राशी वाद झाला होता. या वादातून त्याने राकेशला बेदम लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. जमिनीवर पडून त्याच्या डोक्याला दुखापत झालीहोती. त्यानंतर मारहाण करणारा त्याचा मित्र तेथून पळून गेला होता. काही वेळानंतर स्थानिक रहिवाशांनी त्याला रस्त्याच्या ठेवले होते. दुसरीकडे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या उत्तमला नंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. उत्तम हा मूळचा उत्तरप्रदेशच्या महाराजंग, शैल्हद ऊर्फ कवल्हदच्या बडहरा गावचा रहिवाशी आहे. त्याच्या मृत्यूची माहिती त्याच्या उत्तरप्रदेशातील कुटुंबियांना देण्यात आली होती. शवविच्देन अहवालानंतर उत्तमचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच पोटात झालेल्या रक्तस्त्राव झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
या अहवालानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बालाजी रायवाडे यांच्या तक्रारीवरुन मालाड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मित्राचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच मालाड येथून कृष्णा यादव या ४९ वर्षांच्या आरोपी मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो बिहारचा रहिवाशी असून मजुरीचे काम करतो. त्याचा उत्तम हा मित्र असून तो दारु पित नाही असे माहित असूनही त्याने त्याला दारु पिण्यासाठी जबदस्ती केली होती. दारु पित नाही म्हणून त्याने त्याला मारसहज्ञाण केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.