आरटीओ चलन अ‍ॅपच्या माध्यमातून वयोवृद्धाची फसवणुक

7.60 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 नोव्हेंबर 2025
मुंबई, – आरटीओ चलन अ‍ॅपद्वारे मोबाईलचा ताबा घेऊन एका 65 वर्षांच्या वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने सात लाख साठ हजाराची ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना मालाड परिसरात घडली. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

कमलेश रविंचंद्र चौक्षी हे 65 वर्षांचे वयोवृद्ध मालाड येथे राहतात. सध्या ते निवृत्त झाले असून त्यांच्या मुलाचा स्वतचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये आरटीओ चलन नावाचे एक अ‍ॅप डाऊनलोड केले होते. 24 नोव्हेंबरला त्यांनी एका व्यक्तीकडून एक कार विकत घेतली होती. त्यांनी त्यांच्या मुलाला त्याच्या व्हॉटअपवर दोन हजार रुपयांचे चलन भरण्याचा मॅसेज पाठविला होता. त्यामुळे त्यांच्या मुलाने त्यांच्या मोबाईलच्या आरटीओ चलन अ‍ॅपद्वारे संबंधित रक्कम जमा केली होती.

मात्र दुसर्‍या दिवशी दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात परत आले होते. 26 नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या बँकेचे काही मॅसेज आले होते. त्यात त्यांच्या बँक खात्यातून 4 लाख 90 हजार रुपये एनईएफटीच्या माध्यमातून वजा झाल्याचे नमूद कर्‍यात आले होते. हा मॅसेज वाचत असताना त्यांना पुन्हा त्यांच्या बँकेतून मॅसेज आला होता. या मॅसेजमध्ये त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 70 हजार रुपये डेबीट झाले होते.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी ही माहिती त्यांच्या मुलाला सांगितली. त्यामुळे त्यांच्या मुलाने बँकेत जाऊन त्यांनी संबंधित व्यवहार केले नाही, तरीही त्यांच्या बँक खात्यातून 7 लाख 60 हजार रुपये डेबीट झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांनी त्यांचे बँक खाते फ्रिज केले होते. या घटनेनंतर कमलेश चौक्षी यांनी सायबर पोर्टलसह मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

प्राथमिक तपासात अज्ञात सायबर ठगाने कमलेश चौक्षी यांच्या आरटीओ चलन या अ‍ॅपद्वारे त्यांच्या मोबाईलचा ताबा घेऊन त्याद्वारे ही ऑनलाईन फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page