दोन गुन्ह्यांत चौदा लाखांच्या मुद्देमालाची चोरी

जोगेश्‍वरी-मालाडमधील घटना; चोरीच्या दोन गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – जोगेश्‍वरी आणि मालाड येथील दोन गुन्ह्यांत सुमारे चौदा लाखांच्या मुद्देमालाची घरातील महिला मोलकरणीनेच चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपिला बिश्‍वास आणि करिश्मा खान या दोन्ही मोलकरणीविरुद्ध ओशिवरा आणि मालाड पोलिसांनी दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्याचंी नोंद केली असून पळून गेलेल्या या दोघींचा पोलिसांकडून शोध सुरु आहेत.

मालाड परिसरात बिना पप्पू मौर्या ही तिच्या पती आणि दोन मुलांसोबत राहत असून तिचा गोरेगाव येथील प्रेमनगर परिसरात कपड्याचा व्यवसाय आहे. तिच्याकडे एप्रिल २०२४ पासून करिश्मा खान ही घरकाम करतो. तिच्या फ्लॅटसाठी ती अपार्टमेंटच्या इतर दोन फ्लॅटमध्ये कामाला आहे. जुलै महिन्यांत बिनाला तिच्या एका मैत्रिणीने सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी दिले होते. त्यामुळे तिने ते दागिने तिच्या घरातील कपाटात सुरक्षित ठेवले होते. ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत करिश्मा ही कामावर आली नाही. त्यामुळे तिने तिला कॉल केला. मात्र तिने मोबाईल ब्लॉक केल्याचे तिला दिसून आले. त्यामुळे तिने दुसर्‍या मोबाईलवरुन तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. हा प्रकार तिला संशयास्पद वाटला होता. त्यामुळे शनिवारी १४ सप्टेंबरला तिने कपाटातील दागिन्यांची पाहणी केली असता त्यात सुमारे सव्वाअकरा लाखांचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. तिने चौकशी केल्यानंतर करिश्मा ही तिच्यासह इतर ठिकाणी कामावर येत नव्हती. तिचा मोबाईल बंद येत होता. तिनेच दागिन्यांची चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन तिने मालाड पोलिसांत तक्रार केली होती.

दुसरी घटना जोगेश्‍वरी परिसरात घडली. या परिसरात ३० वर्षांची डान्सर महिला ही तिच्या भावासोबत राहते. फेब्रुवारी २०२४ तिने एका खाजगी कंपनीतून २४ तासांसाठी एका मोलकरणीची मागणी केली होती. त्यानंतर कंपनीने तिच्या घरी अपिला बिश्‍वासला पाठविले होते. ती मूळची आसामची रहिवाशी असून तिच्याकडे सात महिन्यांपासून कामाला आहे. ९ सप्टेंबरला तिच्या घरी गणपतीचे विसर्जन होते. त्यामुळे तिचे मामासह इतर नातेवाईक तिच्या घरी आले होते. विसर्जनानंतर ते सर्वजण रात्री उशिरा घरी आले होते. दुसर्‍या दिवशी तिला कपाटातील दिड लाखांचे दागिने आणि दिड लाखांचे रॅडो कंपनीचे घडयाळ दिसले नाही. त्यामुळे तिने अपिलाकडे विचारणा केली. मात्र तिने काहीच उत्तर दिले नाही. काही वेळानंतर ती घरातून निघून गेली आणि परत आली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने अपिलाविरुद्ध ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. चोरीच्या गुन्ह्यांतील दोन्ही संशयित महिला मोलकरणीचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page