मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मालाड येथे राहणार्या एका 19 वर्षांच्या कॉलेज तरुणाला लिंग बदलण्यासाठी ब्रेनवॉश करुन जबदस्तीने लिंग बदलून त्याचे मानसिक शोषण करुन ब्लॅकमेलसह खंडणी उकाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहरणासह खंडणीसाठी धमकी देणे व अन्य विविध कलमांतर्गत मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सातपैकी चार तृतीयपंथी आरोपींना मालवणी येथून कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. भास्कर औरक्यास्वामी शेट्टी, कावेरी वेलमुर्गन वेदमा निकम, नाझिया गौस शेख ऊर्फ नवाज आणि माही तबरेज खान अशी या चौघांची नावे असून अटकेनंतर या चौघांनाही पुढील चौकशीसाठी मालवणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत नेहा खान, सोहेल खान आणि कृष्णा यादव या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यातील 19 वर्षांचा तक्रारदार तरुण हा मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. तो सध्या एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. ऑगस्ट महिन्यांत त्यांचे काही आरोपीशी ओळख झाली होती. अनेकदा तो त्याला भेटत होता. त्यांच्या घरी जात होता. त्यांच्या घरी असतानाच त्याला नेहा, कावेरी, भास्कर आणि माही या चौघांनी लिंग बदलण्यासाठी बे्रनवॉश केले होते. ते चौघेही त्याला सतत लिंग बदलण्यासाठी दबाव आणत होते. मात्र तो प्रत्येक वेळेस त्यांना नकार देत होता. त्याचा त्यांच्या मनात राग होता. याच रागातून त्यांनी त्याला त्यांच्या मालवणीतील राहत्या घरी कोंडून ठेवले होते. तिथे त्याचा प्रचंड मानसिक शोषण केला होता. त्याला काही श्वानासोबत अश्लील कृत्य करण्यास प्रवृत्त केले होते. त्याचे मोबाईलवर व्हिडीओ बनवून त्याला ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिली होती. त्याने पैसे दिले नाहीतर त्याचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्याला खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याची धमकी दिली होती.
खंडणीच्या धमक्यांना कंटाळून त्याने हा प्रकार त्याच्या आईला सांगितला होता. मुलाची बदनामी होऊ नये म्हणून त्याच्या आईने या आरोपींना तीस हजार ट्रान्स्फर केले होते. तरीही ते त्याला खंडणीसाठी धमकी देत होते. काही दिवसांपूर्वी या आरोपींनी त्याला सुरत येथे आणले होते. तिथे त्याच्याकडून काही मेडीकल दस्तावेज जबदस्तीने स्वाक्षरी घेतली होती. त्यानंतर तिथे त्याच्यावर लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्याला आराम करण्यासाठी मालवणीतील राहत्या घरी आणले. मात्र त्याला आराम न देता त्याला घरगुती कामात गुंतविण्यास आले होते. त्याला मारहाण करुन त्याचा मानसिक शोषण करण्यात आला होता. या शोषणाला तो कंटाळून गेला होता. गुरुवारी 13 नोव्हेंबरला घरी कोणीही नसल्याची संधी साधून तो मालवणीतील घरातून पळून गेला होता.
घडलेला प्रकार त्याने त्याच्या आईला सांगितला. त्यानंतर ते दोघेही कुरार पोलीस ठाण्यात गेले. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी संबंधित सातही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर या आरोपीविरुद्ध अपहरणासह खंडणीसाठी धमकी देणे, लिंग बदलून तरुणाचा मानसिक व शारीरिक शोषण करणे, त्याला श्नानासोबत अश्लील कृत्य करण्यास प्रवृत्त करणे, ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी दबाब आणून खंडणी वसुल करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मालाडच्या मालवणी परिसरात घडल्याने त्याचा तपास नंतर मालवणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. हा गुन्हा वर्ग होताच मालवणी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना यातील काही आरोपी मालवणी परिसरात लपले असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, सहाय्यक फौजदार चंद्रसेन गायकवाड, पोलीस हवालदार गिरीश सुर्वे, संतोष निजाई, सचिन खताते, पोलीस शिपाई सचिन वळतकर, लक्ष्मण चव्हाण, महिला पोलीस शिपाई हिरा जाधव, जयश्री गोसावी यांनी मालवणी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून भास्कर शेट्टी, कावेरी निकम, नाझिया शेख आणि माही खान या चारही तृतीयपंथींना शिताफीने ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनीच तक्रारदार कॉलेज तरुणाला लिंग बदलण्यासाठी ब्रेनवॉश करुन, त्याचे जबदस्तीने लिंग बदलून, त्याला श्वानासोबत अश्लील कृत्य करणे, ब्लॅकमेलसह खंडणीसाठी धमकी दिल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या चौघांनाही पुढील कारवाईसाठी मालवणी पोलिसांकडे सोपविण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर शुक्रवारी दुपारी चारही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
या चौघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांचा महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मरे या तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत इतर तिघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.