मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या आईच्या मित्राने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी मित्राविरुद्ध मालवणी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.
यातील तक्रारदार मालवणी परिसरात राहत असून त्यांना चौदा वर्षांची मुलगी आहे. आरोपी हा त्यांच्या पहिल्या पत्नीचा मित्र असून सध्या तिच्यासोबत तिच्या राहत्या घरी राहतो. दोन दिवसांपूर्वी त्यांची चौदा वर्षांची मुलगी घरात झोपली होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने झोपेत असलेल्या मुलीच्या छातीला नकोसा स्पर्श करुन अश्लील चाळ करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार मुलीकडून तिच्या वडिलांना समजताच त्यांनी मालवणी पोलीस ठाण्यात आरोपी मित्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.