अपहरण करुन अल्ववयीन मुलावर अनैसगिक लैगिंक अत्याचार

आक्सा बिचमधील घटना; २५ वर्षांच्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – अपहरण केलेल्या एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसगिक लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार मालवणीतील आक्सा बिचवर उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मयुर नावाच्या एका २५ वर्षांच्या आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अपहरणासह अनैसगिक लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्हयांत त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिडीत सतरा वर्षांचा मुलगा मालाडच्या मालवणी परिसरात राहतो. बुधवारी ३१ जुलैला तो त्याच्या मित्रासोबत मढच्या आक्सा बिचवर गप्पा मारत बसला होता. सायंकाळी साडेसहा वाजता तिथे मयुर नावाचा एक तरुण आला. त्याने त्याला फुस लावून जवळच्या झाडीमध्ये घेऊन गेला. तिथेच त्याने त्याच्याशी अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊन त्याने त्याला सोडून दिले होते. घरी आल्यानंतर त्याने घडलेला प्रकार त्याच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांनी मालवणी पोलीस ठाण्यात मयुरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची मालवणी पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध १३७ (२), १२६ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीला काही तासांत पोलिसांनी आक्सा बिच परिसरातून अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून काहीच कामधंदा करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page