नशा मुक्ती केंद्रात दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार

संस्थेच्या संचालक-संचालिकेासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 जानेवारी 2026
मुंबई, – नशा मुक्ती केंद्रातील दोन अल्पवयीन मुलीवर संस्थेच्या संचालकाने लैगिंक अत्याचार करुन संचालिकेने एका मुलीचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशामुक्ती फाऊंडदेशन संस्थेच्या संचालकासह संचालिका आणि इतर दोन कर्मचार्‍याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत चारही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. संचालिका महिलेवर पिडीत मुलीचा गर्भपात करणे तसेच इतर दोन कर्मचार्‍यावर इतर पुरुषांसोबत पिडीत मुलीशी लैगिंक चाळे करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. गुरुवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

ही घटना 24 जानेवारी 2024 ते 6 फेब्रुवारी 2025 या कालावधीत मालाडच्या मालवणीतील एका नशा मुक्ती केंद्रात घडली. पिडीत सोळा वर्षांची मुलगी मानखुर्द परिसरात राहते. ती मालाडच्या नशा मुक्ती केंद्रात असताना तिच्यासह तिच्या एका मैत्रिणीवर संस्थेच्या संचालकाने अनेकदा वारंवार लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून तो दोन्ही मुलींना धमकावत होता. त्यामुळे भीतीपोटी त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. याच दरम्यान पिडीत मुलीची मासिक पाळी बंद झाली होती. हा प्रकार तिने संस्थेच्या संचालिका महिलेस सांगितला असता तिने तिला तपासणीसाठी नेले होते. त्यात पिडीत मुलगी गरोदर असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे तिने तिला औषध देऊन तिचा गर्भपात घडवून आणला होता.

याच दरम्यान संस्थेच्या इतर दोन कर्मचार्‍यांनी पिडीत मुलीशी अश्लील चाळे करुन त्यांचा विनयभंग केला होता. इतकेच नव्हे तर त्यांच्याशी इतर पुरुषांना अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त केले होते. अत्याचारानंतर त्यांना जबदस्तीने आंघोळ करण्यास प्रवृत्त केले होते. नशा मुक्ती केंद्राच्या संचालक, संचालिका आणि इतर दोन कर्मचार्‍यांकडून पिडीत मुलीसह तिच्या मैत्रिणीचा सतत मानसिक व शारीरिक शोषण होत होते. या शोषणाला कंटाळून पिडीत मुलीने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.

गुरुवारी ती मालवणी पोलीस ठाण्यात आली आणि तिने तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी संचालकासह संचालिका आणि इतर लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी पळून गेल्याने या गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page