मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जानेवारी २०२४
मुंबई, – मालाडच्या मालवणी परिसरात एका मुलीवर तिच्याच भावाने लैगिंक अत्याचार केल्याचा बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पिडीत मुलगी चौदा तर आरोपी भाऊ पंधरा वर्षांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी भावाला मालवणी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान पिडीत मुलगी गरोदर असल्याने तिला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
३५ वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या पती आणि मुलांसोबत मालवणी परिसरात राहत असून ती घरकाम करते. पिडीत मुलगी आणि आरोपी मुलगा तिचे दोन्ही मुले आहेत. २ ऑगस्ट २०२४ तिचे पतीसह ती कामासाठी बाहेर गेली होती. यावेळी घरात कोणीही नसताना आरोपीने त्याच्याच चौदा वर्षांच्या बहिणीवर लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिली होती. अलीकडेच या मुलीच्या पोटात वेदना होऊ लागले होते. त्यामुळे तिला कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये मेडीकलसाठी नेण्यात आले होते. मेडीकलनंतर ती गरोदर असल्याचे उघडकीस आले होते. तिची तिच्या आईने चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिला सांगिला होता. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने तिच्याच मुलाविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपी भावाविरुद्ध पोलिसांविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चौकशीनंतर त्याला त्याच्या पालकाच्या स्वाधीन करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात डोंगरी परिसरात अशाच प्रकारची घटना उघडकीस आली होती, त्यानंतर आता मालवणी येथे भावाने त्याच्या अल्पवयीन बहिणीवर लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. पिडीत मुलीवर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.