मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ जानेवारी २०२५
मुंबई, – गेल्या चार वर्षांपासून लिव्ह ऍण्ड रिलेशनशीपमध्ये राहणार्या राहुल श्रीपत कांबळे या पार्टनरच्या आत्महत्येप्रकरणी त्याची विधवा प्रेयसीला मालवणी पोलिसांनी अटक केली. उषा जितेंद्र चंडालिया असे या प्रेयसीचे नाव असून अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तिचा मुलगा जतीन जितेंद्र चंडालिया हा सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक शोषणाला राहुल कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
दिपक श्रीपत कांबळे हा गोरेगाव येथे राहत असून मालाडच्या मालवणीतील एका शाळेत शिपाई म्हणून काम करतो. त्याचे वडिल श्रीपंत कांबळे महानगरपालिकेत कामाला होते. मृत राहुल हा त्यांचा भाऊ असून वडिलांच्या निवृत्तीनंतर तो महानगरपालिकेत नोकरीस लागला होता. सध्या तो मालाडच्या लिबर्टी गाड्रन, महानगरपालिकेच्या पी वॉर्डमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. तिथेच उषा हीदेखील कामाला होती. त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. काही दिवसांनी त्यांची मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध झाले. डिसेंबर २०२० पासून राहुल हा मालाडच्या मालवणीतील मार्वे रोड, राठोडी गाव, राधेकृष्णा सेवा सोसायटीमघ्ये राहणार्या उषासोबत लिव्ह ऍण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होता. उषाला तीन मुले असून दोन मुले अंधेरी येथे राहत असून मुलगी लग्नानंतर तिच्या सासरी राहते. लिव्ह ऍण्ड रिलेशनशीपमध्ये असताना त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध आले होते.
गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन भांडण होत होती. त्यातून उषाला दारु पिण्याचे व्यसन लागले होते. अनेकदा घरी आल्यानंतर उषा ही त्याचा मानसिक व शारीरिक शोषण करत होती. त्याच्या मानेवर चाकू ठेवून त्याला जिवे मारण्यासह खोट्या रेपच्या गुन्ह्यांत अडकाविण्याची धमकी देऊन पैसे उकाळत होती. त्यासाठी उषा ही तिचा मुलगा जतीनला घरी बोलावून त्याला मारहाण करत होती. याबाबत राहुलने त्याचा भाऊ दिपकला सांगितले होते. त्यामुळे दिपकने त्याला घरी येण्याचा सल्ला दिला होता. मात्र तो घरी येत नव्हता, त्यामुळे दिपकने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. उषा आणि तिचा मुलगा जतीन यांच्याकडून सुरु असलेल्या मानसिक व शारीरिक शोषणाला राहुल हा प्रचंड कंटाळून गेला होता. त्याला मानसिक नैराश्य आले होते.
याच नैराश्यातून त्याने ८ डिसेंबर २०२४ रोजी राहुलने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी राहुलच्या खिशात पोलिसांना एक सुसायट नोट सापडली होती. त्यात त्याने उषाच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत आहोत. उषा ही विधवा असून तिने तिच्या प्रेमाच्या जाळ्यात मला अडवून आर्थिक फसवणुक केली. माझ्याकडून घेतलेले पैसे ती तिच्या मुलांना देत होती. त्याच्याकडून चार लाख रुपये तिने अंधेरीतील घराची दुरुस्ती केली. अनेकदा उषासह तिचा मुलगा जतीनने मला मारहाण केली. माझा रेपच्या खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याची धमकी देऊन मानसिक व शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला होता.
आत्महत्या करण्यापूर्वी उषा व जतीनने त्याला बेदम मारहाण केली होती. त्यातून त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर दिपक कांबळे याच्या तक्रारीवरुन मालवणी पोलिसांनी उषा आणि तिचा मुलगा जतीन चंडालिया या दोघांविरुद्ध राहुलचा मानसिक व शारीरिक शोषण करुन जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत उषाची पोलिसांनी चौकशी केली होती. या चौकशीनंतर तिच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सध्या ती न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.