देवाच्या दारात चोरट्याची हातसफाई  

देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे पाच मोबाईल पळविले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ जानेवारी २०२५
मुंबई, – सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचा संकल्प मनाशी ठरवत, देवाचे दर्शन घेऊन कामाला श्री गणेशा केला जातो. वर्षाची सुरुवात देव दर्शनाने झाल्याने वर्षभर सुख संपत्ती लाभते असे बोलले जाते. पण चोरट्याने देव दर्शनासाठी आलेल्या भक्तांना देखील सोडले नाही. दर्शनासाठी रांगेत असलेल्या भक्ताचे महागडे मोबाईल चोरून चोरटे पसार झाले. चोरट्याने देवाच्या दारात दर्शनासाठी उभ्या असलेल्या भक्ताचे मोबाईल लांबवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी दादर आणि गावदेवी पोलिसांनी गुन्हे नोंद करून तपास सुरु केला आहे. 

मुंबईकराचे तसेच अखंड देशवासियांचे आराध्य दैवत म्हणून प्रभादेवीच्या सिद्धिविनायक आणि महादेवाचे आश्रय स्थान अशी आख्यायिका असलेल्या बाबुलनाथ मंदिरात भक्त येत असतात. नवंवर्षाच्या अनुषंगाने अनेक भक्त देव दर्शनासाठी कुटुंबियांसोबत येत असतात. वांद्रे येथे राहणारा युवक हा त्याच्या मित्रांसोबत बुधवारी सकाळी सिद्धिविनायक मंदिरात आला. सकाळी मंदिरात गर्दी होती. गर्दी असल्याने त्याने तो फोन खिशात ठेवला होता. युवकाने मंदिर परिसरात फोटो देखील काढले. त्यानंतर त्याचा मोबाईल चोरट्याने लांबवला. काही वेळाने त्याना मोबाईल खिशात नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने दादर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
 कल्याण येथे रहिवासी तक्रारदार हे शिपिंग आणि लॉजिस्टिक मध्ये काम करतात. नववर्षाच्या अनुषंगाने ते मैत्रिणी सोबत बुधवारी बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिराच्या मेन गेटच्या रांगेतून जाताना त्याने मोबाईल खिशात ठेवला. काही वेळाने त्याने खिसा तपासला. तेव्हा त्याच्या खिशात मोबाईल नव्हता. मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात येताच त्याने गावदेवी पोलीस ठाणे गाठले. तसेच त्याच्यासोबत दर्शनासाठी उभ्या असलेल्या तरुणाचा मोबाईल चोरी झाला. तर मालाड येथे राहणारे राहणारे व्यावसायिक हे देखील बुधवारी बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. ते मंदिराच्या लिफ्ट येथे उभे होते. तेथे गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्याचा देखील मोबाईल लांबवला.
नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी चोरट्यांकडून मिळालेल्या या प्रसादामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी दादर आणि गावदेवी पोलिसांनी मोबाईल चोरीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. मंदिरासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page