मानखुर्द व नागपाडा येथील घटनेत दोन नवजात अर्भक सापडले

अर्भकाचा परित्याग करणार्‍या आरोपीच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मानखुर्द आणि नागपाडा येथील घटनेत दोन नवजात अर्भक अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अर्भकाची विल्हेवाट लावून पलायन केल्याप्रकरणी मानखुर्द व नागपाडा पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. अर्भकाचा परित्याग करुन पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. परिसरातील सीसीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नागपाड्यातील तेरावी गलली, मथुरा भवन इमारतीमागील इमारत क्रमांक ८६ जवळ एक पुरुष जातीचे नवजात अर्भक पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या अर्भकाला जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरानी तो मृत असल्याचे सांगितले. नवजात अर्भकाचा जन्म लपविण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने तो अर्भक कचर्‍यात फेंकून विल्हेवाट लावली होती. याप्रकणी क्रिष्णाराज आदिमुलन हरिजन या व्यक्तीच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेपूर्वी मंगळवारी रात्री उशिरा साडेदहा वाजता मानखुर्द येथील मंडाला, नूरी मशिदीजवळील जनतानगर करबळा चाळीसमोर अन्य एक पुरुष जातीचे नवजात अर्भक पोलिसांना सापडले होते. अज्ञात व्यक्तीने या नवजात अर्भकाचा परित्याग करुन खाडीजवळ फेंकून पलायन केले होते. याप्रकरणी मोहम्मद कासिम अब्दुल मुत्तालिक शेख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page