मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – स्वतच्या पंधरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच पित्याने लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे. माणुसकीला काळीमा फासणार्या या घटनेतील ५८ वर्षांच्या आरोपी पित्याला मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोली कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
१५ वर्षांची पिडीत मुलगी ही मानखुर्द परिसरात राहत असून सध्या ती शिक्षण घेत आहे. आरोपी हा तिचा पिता असून तो काहीच कामधंदा करत नाही. ३० एप्रिल ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने त्याच्या मुलीशी अनेकदा जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी अश्लील संभाषण करुन केसाला तेल लावून देतो असे सांगून तिचे अंगावरील कपडे काढले. तिच्या शरीरावर नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केा. तसेच तिच्याशी लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. तीन महिने हा प्रकार अधूनमधून सुरुच होता. भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
मात्र जन्मदात्या पित्याकडून होणार्या लैगिंक अत्याचाराला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या परिचित आणि नंतर मानखुर्द पोलिसांना सांगितला. तिची जबानी नोंदवून पोलिसांनी तिच्या तक्रारीवरुन आरोपी पित्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. पिडीत मुलीला नंतर शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच तिची मेडीकल होणार आहे. दरम्यान अटकेनंतर शनिवारी आरोपी पित्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.