बारा वर्षांच्या भाचीवर मामाकडून विनयभंगासह अत्याचार
गुन्हा दाखल होताच 35 वर्षांच्या आरोपी मामाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 एप्रिल 2025
मुंबई, – बारा वर्षांच्या अल्पवयीन भाचीवर तिच्याच मामाने विनयभंगासह लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने तिच्याच भावाविरुद्ध मानखुर्द पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी िंवनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी मामाला सोमवारी मानखुर्द पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
30 वर्षांची तक्रारदार महिला मानखुर्द परिसरात राहते. तिला बारा वर्षांची एक मुलगी असून ती सध्या एका खाजगी शाळेत शिक्षण घेते. 35 वर्षांचा आरोपी तिचा भाऊ असून पिडीत मुलीचा मामा आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजता त्याने तिच्या मुलीला त्याच्या घरी आणले. घरी येताच त्याने तिला कपडे काढण्यास सांगितले. तिने कपडे काढण्यास नकार देता त्याने स्वतचे कपडे काढून तिच्याशी अश्लील लगट करण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकारानंतर तक्रारदार महिलेने मानखुर्द पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी भावाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच 35 वर्षांच्या आरोपीस मानखुर्द येथून अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन भाचीवर मामानेच केलेल्या विनयभंगासह लैगिंक अत्याचाराच्या घटनेने पिडीत मुलीच्या कुटुंबियांसह नातेवाईकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.