मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – वैवाहिक संबंधात अडसर असलेल्या पत्नीच्या दोन वर्षांच्या अल्पवयीन मुलीची तिच्याच सावत्र पित्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे. या मुलीवर क्रुरपणे लैगिंक अत्याचार करुन नंतर तिची गळा आवळून मारण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी हत्येसह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून २५ वर्षीय सावत्र पित्याला अटक केली आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
२५ वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या दोन वर्षांची मुलगी आणि दुसरा पतीसोबत मानखुर्द येथे राहते. तिने आरोपीसोबत दुसरे लग्न केले असून लग्नानंतर तिची मुलगी तिच्यासोबत राहत होती. ही मुलगी पहिल्या पतीची असल्याने आरोपीला तिचा राग होता. त्यांच्या वैवाहिक संबंधाला ती अडसर होती. गुरुवारी ही महिला कामासाठी बाहेर होती. यावेळी घरात आरोपी हा दोन वर्षांच्या मुलीसोबत होता. रात्री साडेनऊ वाजता त्याने तिला बेदम मारहाण केली. तिच्यासोबत लैगिंक अत्याचार केला. तिच्या पार्श्वभागावर चपाती बनविण्याचे लाटणे घालून तिच्यावर अमानुषपणे लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली होती. या घटनेनंतर तो पळून गेला होता. रात्री तिची तक्रारदार आई घरी आल्यानंतर तिला हा प्रकार समजला. त्यामुळे तिने तिला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिच्या मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या मुलीला मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त होताच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तिच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा दुसरा पतीविरुद्ध १०३ (३), ६४ (२), (१), ६४ (२), (एम), ६५ (२), ६६, २३८ भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ६, ८, १० पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. \
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीला शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी घडलेली घटना शुक्रवारी उघडकीस आल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. इतक्या क्रुरपणे लैगिंक अत्याचार करुन दोन वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या झाल्याने त्याची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करुन त्याला शिक्षा व्हावी यासाठी आता मानखुर्द पोलिसांनी विशेष प्रयत्न केले आहे. या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरडकर हे तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.