सतत होणार्या पैशांच्या मागणी कंटाळून महिलेची आत्महत्या
मानखुर्द येथील घटना; आत्महत्येप्रकरणी पतीला अटक लग्नाला एक वर्ष होण्यापूर्वीच पत्नीने जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – लग्नात योग्य तो मानपान झाला नाही, सोन्याची चैनसह भांड्याच्या पैशांसाठी सतत होणार्या मागणी कंटाळून श्वेता कुणाल लिटे या २३ वर्षांच्या विवाहीत महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात घडली. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आत्महत्येप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे. कुणाल रघुनाथ लिटे असे या आरोपी पतीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. एक वर्षांपूर्वी कुणाल आणि श्वेता यांचा दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने लग्न झाले होते, लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच श्वेताने गळफास घेऊन स्वतचे जीवन संपविल्याचे परिसरात शोककळा पसरली आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी दहा ते रात्री साडेआठच्या सुमारास मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर, म्हाडा कॉलनीत घडल्यो पोलिसांनी सागितले. अलका शांताराम चिखले ही ४० वर्षांची महिला नाशिकच्या निफाड, सुंदरपूरची रहिवाशी असून ती तिचे पती शांताराम, मुलगा ओम यांच्यासोबत राहते. चिखले कुटुंबिय शेती करुन त्यातून मिळणार्या उत्पनावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. २३ वर्षांची श्वेता ही त्यांची मुलगी असून तिचे डी फार्मसीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून तिला शरीरात पांढर्या पेशी कमी होण्याचा आजार असून त्यावर तिचे उपचार सुरु आहेत. त्यामुळे ती लग्नास तयार होत नव्हती. गेल्या वर्षी तिला त्यांच्याच नात्यातील कुणालचे स्थळ आले होते. कुणाल हा उच्चशिक्षित असून एका खाजगी कंपनीत इंजिनिअर होता. तिच्या कुटुंबियांनी श्वेताच्या आजाराविषयी त्याला माहिती दिल्यानंतर दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने त्यांचा २१ मे २०२३ रोजी नाशिक येथे विवाह झाला होता. यावेळी तिच्या कुटुंबियांनी त्याला संसारासाठी लागणारे सर्व प्रकारच्या वस्तूसह ५० हजार रुपये दिले होते. लवकरच त्याला एक सोनसाखळी देण्याचे आश्वासन दिले होते. लग्नानंतर काही महिने श्वेता ही अहमदनगर आणि पुण्यात वास्तव्यास होती.
एक महिन्यांपूर्वी त्याची मुंबईत बदली झाली होती. तेव्हापासून ते दोघेही मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर, म्हाडा कॉलनीत वास्तव्यास होते. मात्र पैशांवरुन त्यांच्यात वाद सुरु होते. अनेकदा ती माहेरी आल्यानंतर तो तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. पैसे घेतल्यशिवाय घरी येऊ नकोस अशी धमक देत होता. १० मेला तिच्या वडिलांनी तिला फोन केला होता. यावेळी तिने कुणालने तिला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे तिच्या पोटात दुखत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी कुणालला जाब विचारला असता त्याने त्यांची मुलगी नाटकी असून तिला काहीच त्रास होत नाही असे सांगितले. यावेळी त्यांनी कुणालला समजविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो समजूत घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच दिवशी सकाळी दहा ते रात्री साडेआठच्या दरम्यान श्वेताने तिच्या राहत्या घरातील लोखंडी कडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही माहिती मिळताच श्वेताचे आई-वडिल मुंबईत आले होते. याप्रकरणी त्यांची ट्रॉम्बे पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस येताच कुणाल लिटेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच कुणालला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.