माटुंगा येथे बेस्ट बस अपघातात मायलेकाचा दुर्देवी मृत्यू

अपघाताला जबाबदार आरोपी बसचालक अटकेत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑगस्ट 2025
मुंबई, – माटुंगा येथे बेस्ट बस अपघातात मायलेकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये महिलेसह तिच्या सात वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. ईलोगोलिस लेओबा सेल्वराज आणि अ‍ॅन्थोनी लेओबा सेल्वराज अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी माटुंगा पोलिसंनी हलर्जीपणाने बस चालवून मायलेकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या बसचालक बाबूराव शिवाजी नागणबोने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

हा अपघात सोमवारी दुपारी सव्वातीन वाजता माटुंगा येथी वडाळा ब्रिज, पेन्सिल बसस्टॉपजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अरुलदास सग्याराज अरजिन्स हे वडाळा येथील सॉल्टपेन रोड, हिंमतनगरचे रहिवाशी आहेत. मृत ईलोगोलिस ही त्यांची मावशी तर अ‍ॅन्थोनी हा तिचा मुलगा आहे. सोमवारी दुपारी त्यांची मावशी तिच्या मुलासोबत माटुंगा येथे गेली होती. दुपारी सव्वातीन वाजता पेन्सिल बसस्टॉपजवळ बसची वाट पाहत असताना तिच्यासह तिच्या मुलाला एका बेस्ट बसने जोरात धडक दिली होती. त्यात चाकाखाली आल्याने ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताचीम माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

अपघातात जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती नंतर मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली होती. याप्रकरणी अरुलदास अरजिन्स यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बेस्ट बसचालक बाबूराव नागणबोने यांच्याविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर बसचालक पळून गेला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या बाबूराव नागणबोने याला पोलिसांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page