मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 फेब्रुवारी 2025
मुंबई, – माटुंगा येथील पारशी कॉलनीतील महानगरपालिकातर्फे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामासाठी लावण्यात आलेले लोखंडी बेरीकेट्स चोरी करणार्या एका वॉण्टेड आरोपीस माटुंगा पोलिसांनी अटक केली. महेश सुरेंद्रप्रसाद गुप्ता असे या 21 वर्षीय आरोपीचे नाव असून तो कल्याणचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेने चार गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून याच गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी माटुंगा येथील पारशी कॉलनी परिसरात महानगरपालिकेने रस्ता बनविण्यासाठी काही लोखंडी बेरीकेट्स लावले होते. मात्र रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्याने संबंधित बेरीकेट्स चोरी केले होते. हा प्रकार दुसर्या दिवशी उघडकीस येताच महानगरपालिकेकडून माटुंगा पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरु असतानाच माटुंगा पोलिसांच्या एका विशेष पथकाने कल्याण येथून महेश गुप्ता याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच या गुन्ह्यांसह इतर तीन गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल, 23 लोखंडी बेरीकेट्स असा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त आर रागसुधा, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील, पोलीस शिपाई जुवाटकर, देशमाने, मेटकर, तोंडासे, बहादुरे, सोलवलकर यांनी केली.