दुर्गम डोंगराळ भागात सुरु होता एमडी ड्रग्जचा कारखाना

पोलीस शिपायासह सातजणांना तेरा कोटीच्या ड्रग्जसहीत अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 एप्रिल 2025
मुंबई, – लातूर येथील रोहिणा गावातील दुर्गम डोंगराळ भागत सुरु असलेल्या एका एमडी ड्रग्जच्या कारखान्याचा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका पोलीस शिपायासह सातजणांना या अधिकार्‍यांनी अटक केली असून या कारवाईत सतरा कोटीचे एमडी ड्रग्ज तसेच ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही कारवाई करणयात आल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांत विविध शहरात एमडी ड्रग्जचे कारखाने मुंबई पोलिसांसह मुंबई युनिटच्या डीआरआय आणि एनसीबीच्या अधिकार्‍यांनी उद्धवस्त केले आहेत. तरीही काही ठिकाणी अद्याप छुप्या पद्धतीने एमडी ड्रग्जचे कारखाने सुरु असून या कारखान्यात बनविण्यात येणारे एमडी ड्रग्ज मुंबईसह इतर शहरात विकले जात असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर अशा ड्रग्ज कारखान्यांची माहिती काढण्यास या अधिकार्‍यांनी सुरुवात केली होती.

ही माहिती काढताना लातूर येथील रोहिणा गावातील दुर्गम डोंगराळ भागात एक एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु असल्याची माहिती या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्‍यांनी मंगळवारी पहाटे रोहिणा गावातील दुर्गम भागात छापा टाकून तिथे सुरु असलेल्या एमडी ड्रग्जच्या कारखान्यांचा पर्दाफाश केला. या कारवाईत या अधिकार्‍यांनी 11 किलो 160 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सतरा कोटी असल्याचे सांगण्यात आले.

या ड्रग्जसहीत मोठ्या प्रमाणात कच्चा माल, प्रयोगशाळेतील उपकरणे, इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्ज कारखान्यात एका पोलीस शिपायासह इतर पाचजणांचा सहभाग येताच त्यांच्याावर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीनंतर इतर दोन वितरकांना मुंबईतून या अधिकार्‍यांनी अटक केली. या सर्वांची संंबंधित अधिकार्‍यांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page