झटपट पैशांसाठी क्लब कर्मचारी व ब्रोकरकडून एमडी ड्रग्जची विक्री

जोगेश्‍वरी येथून ४३ लाखांच्या एमडी ड्रग्जसहीत दोघांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
मुंबई, – जोगेश्‍वरी येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी ४३ लाख रुपयांचे १५५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले आहेत. आकाश अनिल सिंग आणि भवन हयातसिंग अधिकारी अशी या दोघांची नावे आहेत. यातील आकाश हा एका क्लबमध्ये कामाला आहे तर भवन हा ब्रोकर म्हणून काम करत होता. झटपट पैशांसाठी ते दोघेही ड्रग्ज तस्करीत सामिल झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जोगेश्‍वरी येथे काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी युनिट दहाच्या अधिकार्‍यांनी जोगेश्‍वरीतील बेहरामबाग परिसरात सापळा लावला होता. रात्री उशिरा दोन वाजता तिथे आकाश आला होता. यावेळी त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांना पाहताच तो पळू लागला. यावेळी पळून जाणार्‍या आकाशला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी अकरा लाख रुपयांचा ५० ग्रॅम वजनाचा एमडी जप्त केले. त्याच्या चौकशीत भवनचे नाव समोर आले होते. त्यानंतर या पथकाने एका इमारतीजवळ आकाशची वाट पाहत असलेल्या भवनला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ३२ लाख रुपयांचे १०५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी १५५ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले असून त्याची किंमत ४३ लाख रुपये इतकी आहे. चौकशीत ते दोघेही तिथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आले होते. मात्र ड्रग्जची विक्री करण्यापूर्वीच या दोघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत आकाश हा एका क्लबमध्ये कामाला आहे तर भवन हा ब्रोकरचे काम करतो. झटपट पैशांसाठी या दोघांनी एमडी ड्रग्ज विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. एनडीपीएल कलमांतर्गत अटक केल्यानंतर या दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांना ते ड्रग्ज कोणी दिले, ते ड्रग्ज कोणाला विक्री करणार होते. त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page