मेडीकल रिसर्च प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुक
लेखिकेच्या तक्रारीवरुन डॉक्टर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2025
मुंबई, – मेडीक रिसर्च प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परवाता देते असे सांगून एका अनिवासी भारतीय महिलेची सुमारे 41 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या लेखिकेच्या तक्रारीवरुन शेनिला अतिशाम सय्यद या डॉक्टर महिलेविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शेनिनाने अनेकांना तिच्या कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीनंतर ती सौदी अरेबियाला पळून गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे तिच्या अटकेसाठी ओशिवरा पोलिसांकडून लवकरच रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात येणार आहे.
दुमिता ऊर्फ दिया बलजीत आलूवालिया ही 27 वर्षांची महिला अनिवासी भारतीय असून लेखिका आहे. मूळची ऑस्टे्रलियाची रहिवाशी असलेली दिया ही अंधेरीतील विरा देसाई रोड, प्रथमेश कॉम्प्लेक्सच्या स्पेक्ट्रा टॉवर अपार्टमेंटमध्ये राहते. तिचा फजल खान हा मित्र असून त्याच्या मार्फत तिची शेनियासोबत ओळख झाली होती. शेनिला ही डॉक्टर असून तिच्या प्रोजेक्टमध्ये त्याने गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्याला चांगला परतावा मिळत असल्याचे त्याने तिला सांगितले होते. 15 एप्रिल 2023 रोजी फजलने तिची शेनिलाशी भेट घडवून आणली होती. यावेळी तिने तिला तिची जाईना क्रिएशन नावाची एक कंपनी असून ही कंपनी मुंबई शहरातील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मेडीकल रिसर्च प्रोजेक्ट करते. या कंपनीत गुंतवणुक केल्यास तिला हमखास चांगला परतावा मिळेल असे सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. तिचा मित्र फजल तिच्या कंपनीत गुंतवणुक करत होता, त्यामुळे तिनेही तिच्या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिने तिच्याकडे टप्याटप्याने सुमारे 41 लाखांची गुंतवणुक केली होती.
डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत या गुंतवणुकीवर तिला सुरुवातीला सुमारे साडेबावीस लाख रुपये परतावा म्हणून मिळाली होती. त्यामुळे तिला तिच्यावर विश्वास बसला होता. मात्र नंतर तिने परताव्याची रक्कम देणे बंद केली होती. तिचा मोबाईल बंद येत होता. तिच्याकडे तिच्यासह इतर काही लोकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली होती. या सर्वांना परताव्याची रक्कम मिळणे बंद झाली होती. त्यामुळे सर्वजण एकमेकांकडे चौकशी करत होते. चौकशीदरम्यान शेनिला ही कुठेतरी निघून गेली होती, ती तिच्या घरीही नव्हती. याच दरम्यान शेनिला ही सौदी अरेबियाच्या जेद्दा येथे पळून गेल्याचे तिला समजले. याबाबत तिच्यासह तिचा मित्र फजल खान यांनी चौकशी केली असता शेनिलाने बर्याच लोकांना तिच्या कंपनीत मेडीकल रिसर्चच्या नावाने चांगला परतावा देते असे सांगून गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते.
तिच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती. सुरुवाीतला सर्वांना परताव्याची रक्कम तिने त्यांचा विश्वास संपादन केला, मात्र नंतर ती अचानक गायब झाली आणि नंतर ती सौदीला पळून गेल्याचे समजले. तिने गुंतवणुकदारांना दिलेले सर्व धनादेश बँकेत न वटता परत आले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात दिया आलूवालिया हिने ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर शेनिला सय्यद हिच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता असल्याने तिच्याकडून फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी ओशिवरा पोलिसांकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आला आहे.