नाल्यात पडून पोलीस उपनिरीक्षक गंभीररीत्या जखमी

एडीआरचा पंचनामा करताना घडलेला प्रकार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बोरिवली येथील दहिसरच्या दिशेने जाणार्‍या नाल्यात पडलेल्या तरुणाच्या मृत्यूचा एडीआरचा करताना लोकलच्या हॉर्नमुळे नाल्यात पडून पोलीस उपनिरीक्षक गंभीररीत्या जखमी झाले. मुकेश खरात असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून ते सध्या एमएचबी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्यावर हिंदुजा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

मुकेश खरात हे त्यांच्या पत्नीसोबत बोरिवली पोलीस वसाहतीत राहत असून सध्या एमएचबी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ते ११९ ब्रॅचचे पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची एमएचबी पोलीस ठाणे पहिलेच पोलीस ठाणे आहे. सोमवारी ते नेहमीप्रमाणे पोलीस ठाण्यात हजर झाले होते. बोरिवलीतील दहिसरच्या दिशेने जाणार्‍या एका नाल्यात तरुण पडला आहे, पोलीस मदतीची गरज आहे असा कॉल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून आला होता. या माहितीनंतर मुकेश खरात हे त्यांच्या पोलीस पथकासोबत घटनास्थळी रवाना झाले होते. नाल्याजवळ विविध अँगलने पंचनामा करताना अचानक एका लोकलच्या लॉर्नमुळे त्यांचा तोल गेला आणि ते वीस फुट नाल्यात पडले होते. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर जे. जे आणि हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे नाल्यात पडलेल्या तरुणाला नंतर शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. हृदयविकराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनेची एमएचबी पोलिसांकडून नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page