एमआयडीसी पोलिसांचे ऑपरेशन बेबी यशस्वी 

मध्य प्रदेश मध्ये पोलीस होते तळ ठोकून 

0
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जून २०२४
मुंबई, – साकीनाका सारख्या परिसरात एकाच वेळी आई आणि चार भावंड गायब होतात… आई भीती पोटी घरी येते.. त्यानंतर मुलांच्या नातेवाईकानी ती मूल विक्री केल्याचा आरोप होतो..  मुलाकडे मोबाईल नसल्याने आणि ते सोशल मीडियायावर सक्रिय नसल्याने त्याचा शोध घेण्यात येत असलेल्या अडचणी… माध्यमामध्ये येणाऱ्या बातम्या… अशा स्थितीत एमआयडीसी पोलिसांनी डोक्यावर बर्फ ठेवला. पोलिसांनी ऑपरेशन बेबी हाती घेऊन बेपता झालेल्या त्या भावंडाना अखेर मध्य प्रदेशच्या संस्थेतून शोधून काढले. त्या मुलांना लवकरच त्याच्या पालकाच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.
साकीनाका परिसरात एक कुटुंब राहते. वडील, आई आणि चार भावंड असा त्याचा परिवार. वडिलांचा रागीट स्वभाव असल्याने मुले चिडचिड करायची. अचानक २६ मे ला मुलांची आई, आणि चार भावंड हे कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले. रात्री मुलाचे वडील घरी आले. त्याने मुलाच्या मामाना संपर्क केला. तेव्हा मुलं मामाकडे आली नसल्याचे सांगण्यात आले. मामाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला.
गुन्हा नोंद केल्यावर मुलाची आई घरी आली. आई घरी आल्यावर मामाने अनेक आरोप केले. अतिरिक्त आयुक्त परमजित सिंह दहिया यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी तपासासाठी चार पथक तयार केले. एका पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तर दुसऱ्या पथकाने मुलांच्या आईकडे देखील चौकशी केली. ते सर्वजण अंधेरी येथून कल्याण येथे गेले. तेथून पंजाब मेल ने खांडवा रेल्वे स्थानकात आले. तेथे आल्यावर मुलांच्या आईने घरी जाऊया असे सांगितले. मात्र मोठी मुलगी ही तिच्या तीन भावंडांसोबत घरी जाण्यास तयार नव्हती. भीती पोटी मुलांची आई घरी आली. पोलिसांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा ते चौघे भांवंड मध्य प्रदेशच्या ग्वालेर येथे उतरले होते. तेथे त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटला. त्याच दरम्यान एमआयडीसी पोलिसांचे पथक मध्य प्रदेश येथे तळ ठोकून होते. पोलिसांनी ग्वालेर येथील ७०-८० फुटेज ची तपासणी केली. तेव्हा हा प्रकार समोर आला. एका व्यक्तीने त्या मुलांना माधव बाल निकेतन या संस्थेत सोडले होते. त्या संस्थेत मुलाची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली होती. पोलिसांचे पथक त्या संस्थेत गेले. तेथे ती चार भावंडं आढळून आली. त्यानंतर त्या चौघा भावंडाना बाल कल्याण समिती समोर हजर केले. मुलांना मुंबईत आणण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी ऑपरेशन बेबी यशस्वी केले. एमआयडीसी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत दहिया, पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तुकाराम कोयंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, अहिरे, जगताप, पोलीस हवालदार पिसाळ, नाईक, पोलीस शिपाई चव्हाण यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page