मिसिंग अडीच वर्षांचा मुलगा महिलेच्या सतर्कमुळे सापडला
गुन्हे शाखेच्या प्रयत्नांना यश; मुलाचा ताबा पालकाकडे
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२४
मुंबई, – खेळता खेळता घरापासून काही अंतर गेल्यानंतर मिसिंग झालेला एक अडीच वर्षांचा मुलगा एका महिलेच्या सतर्कमुळे सापडला. या महिलेकडून मुलाची सुखरुप सुटका करुन त्याला त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष शोधमोहीम हाती घेऊन काही तासांत या मुलाची सुखरुप सुटका केली. या कामगिरीबाबत मुलाच्या पालकांसह स्थानिक रहिवाशांनी गुन्हे शाखेचे आभार व्यक्त केले आहेत.
यातील तक्रारदार त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांसोबत गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहतात. याच परिसरात त्यांचा एसी रिपेरिंगचा व्यवसाय आहे. त्यांना एक अडीच वर्षांचा मुलगा आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता हा मुलगा घरासमोरच खेळत होता. काही वेळानंतर तो अचानक मिसिंग झाला होता. त्याच्या आईसह स्थानिक रहिवाशांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. रात्री उशिरापर्यंत मुलगा न सापडल्याने तबरेज अन्सारी यांनी शिवाजीनगर पोलिसांत त्यांचा मुलगा मिसिंग झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद करुन मुलाचा शोध सुरु केला होता. शिवाजीनगर आणि मानखुर्द परिसरात अशाच प्रकारच्या काही घटना घडल्याने त्याचा संमातर तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेला देण्यात आले होते. त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देवडीकर, पोलीस उपनिरीक्षक मुठे, महिला पोलीस उपनिरीक्षक माशेरे, पोलीस हवालदार वानखेडे, शिंदे, डाळे, महिला पोलीस शिपाई सरोदे, अभंग यांनी परिसरातील २० ते २५ सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन मुलाचा फोटो दाखवून त्याचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना शिवाजीनगरच्या दारुल इमात मशिदीत चौकशी करताना पोलीस उपनिरीक्षक मुठे, माशेरे, सरोदे यांना वीर सावरकर शाळेजवळ एका महिलेला अडीच वर्षांचा मुलगा सापडला होता. त्याने त्याच्याविषयी परिसरात चौकशी केली, मात्र त्याला कोणीही ओळखत नव्हते. त्यामुळे त्याने जवळच्या या मशिदीत तिचा मोबाईल क्रमांक देऊन मुलगा तिच्याकडे असल्याचे सांगितले होते. ही माहिती प्राप्त होताच या पथकाने या महिलेला संपर्क साधला होता. तिनेही मिसिंग झालेला मुलगा तिच्याकडे सुखरुप असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यानंतर या पथकाने या मुलाला ताब्यात घेऊन त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. मिसिंग झालेला मुलगा काही तासांत सुखरुप सापडल्याने त्याच्या पालकांसह स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुलाला सुरुखप ताब्यात दिल्याबद्दल गुन्हे शाखेचे त्याच्या पालकांनी आभार व्यक्त केले होते.