मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 ऑगस्ट 2025
मुंबई, – रविवारी उशिरा घरातून निघून गेलेली आणि मिसिंग झालेल्या एका 24 वर्षांच्या तरुणीचा सोमवारी दुपारी नरिमन पॉईट येथील समुद्रात मृतदेह सापडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये शोककळा पसरली होती. मनिता तेजबल गुप्ता असे या तरुणीचे नाव असून तिने आत्महत्या केली की तिचा अपघात झाला याबाबत अधिकृत काहीही सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान कफ परेड पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
मनिता गुप्ता ही कफ परेड येथील गणेशमूर्ती, पार्ट क्रमांक तीन, गल्ली क्रमांक पाचमध्ये तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. रविवारी सव्वाअकरा वाजता ती शौचालयात गेली होती, मात्र बराच वेळ होऊन ती घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळींकडे चौकशी केली. मात्र मनिता कुठेच सापडली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी कफ परेड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मनिताची मिसिंग तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत मिसिंग तक्रार नोंदवून तिचा शोध सुरु केला होता.
तिचा शोध सुरु असताना नरिमन पॉईट येथील समुद्रात एका तरुणीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांकडून कफ परेड पोलिसांना माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर कफ परेड पोलिसांनी अग्निमशन दलासह घटनास्थळी धाव घेतली होती. पाण्यातून तरुणीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर ती मिसिंग असलेली नमिता असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
नमिताने आत्महत्या केली की तिचा अपघात झाला याचा खुलासा होऊ शकला नाही. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर काही गोष्टींचा उलघडा होईल असे पोलिसानी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. दरम्यान मिसिंग असलेल्या नमिताच्या मृतदेह सापडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.