मनपा-खाजगी कंपन्यांमधील दोन मध्यस्थांना अटक व कोठडी
मिठी नदीच्या पूर्नर्जिवितता 65 कोटीचा आर्थिक घोटाळा प्रकरण
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 मे 2025
मुंबई, – मिठी नदीच्या पूर्नर्जिवितेत झालेल्या 65 कोटी 54 लाखांच्या आर्थिक घोटाळ्यात महानगरपालिका अधिकारी आणि खाजगी कंपन्यासह कंत्राटदारामध्ये मध्यस्थीची महत्त्वाची भूमिका बजाविणार्या दोन मध्यस्थाना अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. केतन अरुण कदम आणि जय अशोक जोशी अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून या घोटाळ्यासंदर्भातील महत्त्वाचे आक्षेपार्ह कागदपत्रासंसह इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने मंगळवार 13 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील ही पहिली अटक असू आगामी काळात काही बडे मनपा अधिकार्यासह खाजगी कंपन्यांचे संचालकावर अटकेची कारवाई होणार आहे त्यात मनपाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत रामुगडे, गणेश बेंद्रे, तायशेट्टे, दिपक मोहन, किशोन मेनन, जय जोशी, केतन कदम, भुपेंद्र पुरोहित यांच्यासह अॅक्युट डिजाईन्स, कैलास कंन्ट्रक्शन, एन. ए कन्स्ट्रक्शन, निखिल कंन्स्ट्रक्शन, जे. आर एस इन्फ्रास्टक्चर कंपनीच्या संचालकाचा समावेश आहे.
मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी तसेच टाकण्यासाठी जागेचे नऊ बोगस करार तयार करण्यात आले होते. यातील बहुतांश करारामध्ये कंत्राटदाराच्या जागेवर दुसर्याच व्यक्तीने स्वाक्षरी होती, काहीवर कंत्राटदारची स्वाक्षरी नव्हती तर काही एमओयूवर तारीख टाकण्यात आली नव्हती. याबाबत संबंधित जागा मालकांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत या जागा मालकांनी अशा प्रकारे कोणताही करार केला नव्हता. अॅक्युट डिझाईन्स, कैलास कंन्स्ट्रक्शन, एन. ए कंन्स्ट्रक्शन, निखिल कंन्स्ट्रक्शन, जे. आर. एस इन्फ्रास्टक्चर आदी कंपनीच्या संचालकांनी बोगस एमओयू बनवून ते महानगरपालिकेत सादर केले होते. त्यानंतर महानगरपालिकेच्या पर्जन्य जल वाहिन्या विभागाच्या अधिकार्यांनी त्याची कुठलीही शहानिशा केली नव्हती.
मनपाच्या संबंधित अधिकार्यांनी स्वतच्या पदाचा गैरवापर करुन या बोगस निविदावरुन संबंधित कंपनीला सुमारे 65 कोटीचे पेमेंट करण्यास प्रवृत्त केले होते. या कंपन्यांनी प्रत्यक्षात मिठी नदीचा कुठलाही गाळ काढला नव्हता. तरीही या कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट मंजूर करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणात उघडकीस येताच संंबंधित सर्व आरोपीविरुद्ध आझाद मैदान पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पालिकेच्या तिन्ही अभियतासह मध्यस्थ आणि कंपनीच्या संचालकाच्या घरासह कार्यालयात छापेमारी करण्तया आली होती. या कारवाईत मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह दस्तावेज पोलिसांनी जप्त केले होते. त्यात महत्त्वाच्या कागदपत्रांसह मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह आदीचा समावेश आहे.
याच गुन्ह्यांत मंगळवारी केतन कदम आणि जय जोशी या दोन मध्यस्थांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही मंगळवारी 13 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतन कदमच्या घरासह कार्यालयाच्या झडतीत काही पोस्टिंग आदेशाच्या प्रती, निविदासंदर्भातील नस्तीच्या फोटो कॉपी, कॅश घेतल्याचे नोंदी सापडल्या आहेत. याकामी त्याला जय जोशी याने मदत केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे या दोघांवर ही कारवाई करण्यात आली होती.