केईएम हॉस्पिटलच्या डॉक्टरचा मोबाईल पळविणारा आरोपी गजाआड

मोबाईल चोरीच्या नऊ गुन्ह्यांची उकल तर नऊ मोबाईल जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 फेब्रुवारी 2026
मुंबई, – केईएम हॉस्पिटलच्या एका डॉक्टरचा मोबाईल चोरी करुन पळून गेलेल्या आरोपीस भोईवाडा पोलिसांनी अटक केली. फिरोज इस्माईल शेख असे या 40 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने मोबाईल चोरीच्या नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील चोरीचे नऊ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

यातील तक्रारदार व्ववसायाने डॉक्टर असून सध्या ते केईएम हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. 4 जानेवारीला ते नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये आले होते. कामात व्यस्त असताना अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. हॉस्पिटलसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांत फिरोज शेख याचा सहभाग उघडकीस आला होता.

या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकूर, पोलीस निरीक्षक नितीन महाडिक यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन बोरसे, अनिल भोंग, पोलीस हवालदार नथ्थुराम चव्हाण, नितीन धंगेकर, महादेव माळी, संतोष खेडेकर, पोलीस शिपाई जयदीप पाटील, प्रदीप राठोड, अविनाश सुतार, पंकज रोकडे, हेमंत सुळे, शंकर जोशी यांनी फिरोज शेख याला तांत्रिक माहितीवरुन शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

त्याने तक्रारदार डॉक्टरचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांसह त्याने इतर आठ मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून या गुन्ह्यांत सर्व मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून त्याची किंमत एक लाख रुपये इतकी आहे. फिरोज हा रात्रीच्या वेळेस मोबाईल करत होता. डॉक्टरचा मोबाईल चोरी केल्यानंतर तो पुन्हा केईएम हॉस्पिटलमध्ये चोरीच्या उद्देशाने आला होता. मात्र त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासाठी पोलिसांनी तिथे सतत सात ते आठ दिवस पाळत ठेवली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page