मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – शहात विविध घटनेत पाच अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह सातजणांविरुद्ध पाच स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तिघांना पोलिसांनी अटक केली तर दोन्ही महिलांसह इतर चौघांवर लवकरच अटकेची कारवाई केली जाणार आहे. या पाचही घटना धारावी, वरळी, ताडदेव, बोरिवली आणि वांद्रे परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
धारावी येथे एका पंधरा वर्षांच्या मुलीचा अज्ञात तरुणाने विनयभंग करुन पलायन केले. ही मुलगी धारावी येथे राहत असून गुरुवारी सकाळी पावणेसात वाजता अबूबकर चाळीसमोरुन जात होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिला मागून मिठी मारली. तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभं गकलेा. त्यानंतर तो तेथून पळून गेला. हा प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर धारावी पोलिसांना तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुदध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. वरळी येथे नऊ वर्षांच्या मुलीला मोबाईलवरुन अश्लील व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच रविंद्र नावाच्या ४८ वर्षांच्या आरोपीस ताडदेव पोलिसांनी अटक केली. नऊ वर्षांची ही मुलगी वरळी येथे राहते. १० ऑगस्टला तिच्याशी लिफ्टमध्ये रविंद्रने अश्लील वर्तन करुन तिला मोबाईलवरुन अश्लील व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग केला होता. तो तिचा सतत पाठलाग करणे, तिला पाहून अश्लील इशारे करत होता. त्यामुळे या मुलीने तिच्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिने ताडदेव पोलिसांत रविंद्रविरुद्ध तक्रार केली होती.
अशीच दुसरी घटना बोरिवली परिसरात घडली. घरात रंगकाम करणार्या अमीत महेंद्र भट्टू याने तक्रारदार महिलेच्या नऊ वर्षांच्या मुलीकडे सुका कपडा मागण्याचा बहाणा करुन तिच्या छातीसह प्रायव्हेट पार्टसला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने एमएचबी पोलिसात अमीतविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. तिसर्या घटनेत एका नऊ वर्षांच्या मुलीचा तिच्या आजीसह आत्याने पायव्हेट पार्टला जोरात चिमटा काढून तिचा विनयभंग केला होता. तक्रारदार खार येथे राहत असून त्यांची बळीत नऊ वर्षांची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे त्यांच्या आई आणि बहिणीसोबत वाद सुरु होता. याच वादातून या दोघींनी त्यांच्या मुलीशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. मुलीकडून हा प्रकार समजताच त्याने निर्मलनगर पोलिसांत आईसह बहिणीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वांद्रे येथे अन्य घटनेत एका सोळा वर्षांचा मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी ही मुलगी सामान आणण्यासाठी घरासमोरील दुकानात गेली होती. यावेळी साहिल नावाच्या १९ वर्षांच्या तरुणाने तिच्या छातीला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास तिच्यासह तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली होती. दुकानातून घरी आल्यानंतर या मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी वांद्रे पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच साहिलला विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली.