प्रेयसीचे अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करुन बदनामीचा प्रयत्न

विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा करुन प्रियकराचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मार्च 2026
मुंबई, – घटस्फोटीत प्रेयसीसोबतच्या शारीरिक संबंधाचे अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करुन बदनामीचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी प्रियकराविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगासह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन असे या आरोपीचे असून त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आला आहे. त्याचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दुजोरा दिला आहे. प्रेयसीच्या तक्रारीवरुन अंदमानच्या स्थानिक पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा तपास सीएसएमटी रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे.

27 वर्षांची तक्रारदार महिला ही मूळची अंदमानची रहिवाशी असून ती तिच्या कुटुंबियांसोबत तिथे राहते. काही वर्ष तिने झारखंड येथे नोकरी केली होती. याच दरम्यान तिची एका तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले होते. त्यानंतर या दोघांनी विवाह केला होता. विवाहानंतर त्यांना एक मुलगा झाला होता. याच दरम्यान त्यांच्यात क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन वाद होत होते. त्यात तिचे पतीसोबत नेहमी भांडण होत होते. सततच्या कौटुंबिक वादातून त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. काही वर्ष विभक्त राहिल्यानंतर त्यांनी संमतीने घटस्फोट घेतला होता.

घटस्फोटानंतर ती ओरिसा येथे गेली होती. तिथे तिला एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली होती. तिथे काम करताना तिची चंदन नावाच्या आरोपीशी ओळख झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले. त्यामुळे त्यांनी लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. काही वर्ष लिव्हमध्ये राहत असताना त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. त्यातून तिला एक मुलगी झाली होती. या शारीरिक संबंधाचे आरोपीचे त्याच्या मोबाईलवरुन काही फोटोसह अश्लील व्हिडीओ बनविले होते. ते व्हिडीओ दाखवून तो तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता.

याच कारणावरुन तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. त्यानंतर ती तिच्या अंदमान येथील घरी निघून गेली होती. तिने त्याच्याशी सर्व संबंध तोडून टाकल्याने त्याने तिचे अश्लील फोटोसह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार तिच्या लक्षात येताच तिने अंदनानच्या स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चंदनविरुद्ध विनयभंगासह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

चंदन हा दक्षिण मुंबईतील राहत असल्याने या गुन्ह्यांचा तपास नंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यांची कागदपत्रे हाती येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तक्रारदार महिलेची पोलिसांची चौकशी करुन चंदनविषयी जास्तीत जास्त माहिती काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दुजोरा दिला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चौकशीनंतर आरोपीवर लवकरच अटकेची कारवाई केली जाईल असे सांगितले.

गुन्हा अंदमानला; तपास मुंबई रेल्वे पोलिसांकडे
बळीत तक्रारदार महिला अंदनामनची रहिवाशी असून अदमानला असतानाच तिला तिचे अश्लील फोटोसह व्हिडीओ चंदनने सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे तिने स्थानिक पोलिसांना हा प्रकार सांगून चंदनविषयी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर स्थानिक पोलिसांनी चंदनविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चंदन हा दक्षिण मुंबईत राहत असल्याने स्थानिक पोलिसांनी हा तपास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला होता. गुन्हा घडला अंदनानला, मात्र त्याचा तपास स्थानिक पोलिसांनी रेल्वे पोलिसांकडे वर्ग केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आरोपी दक्षिण मुंबईत राहत असल्याने स्थानिक पोलिसांनी गुन्ह्यांचे कागदपत्रे रेल्वे पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मूळात हा गुन्हा अंदमानला घडला आहे, त्यामुळे स्थानिक पोलिसांकडून गुन्ह्यांचा तपास करणे अपेक्षित होते, मात्र पोलिसांनी गुन्ह्यांचे कागदपत्रे रेल्वे पोलिसांकडे पाठवून दिले होते. हा प्रकार वरिष्ठांना सांगण्यात आला असून वरिष्ठांच्या आदेशानंतर रेल्वे पोलिसांनी गुन्ह्यांचा तपास सुरु केला असून आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page