दोन घटनेत आठ व सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग

विलेपार्ले-मालाडमधील घटना; एकाला अटक तर दुसर्‍याचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ जुलै २०२४
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत आठ आणि सतरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला. या दोन्ही घटना विलेपार्ले आणि मालाड परिसरात घडल्या. याप्रकरणी मालवणी आणि जुहू पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन एका आरोपीस अटक केली तर पळून गेलेल्या दुसर्‍याचा शोध सुरु केला आहे.

३० वर्षांची तक्रारदार महिला मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून तिला आठ वर्षांची मुलगी आहे. तिच्याकडे आरोपी फिरोज नसीर शेख (१९) हा घरकाम करतो. सोमवारी सकाळी ती घरी काम करत होती. यावेळी तिने नसीरला पाण्याचा हांडा वरच्या माळ्यावरील किचनमध्ये ठेवण्यास सांगितले. काही वेळानंतर तो किचनमध्ये गेला. यावेळी हॉलच्या बेडमध्ये झोपलेल्या आठ वर्षांच्या मुलीसोबत त्याने अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकारामुळे या मुलीला जाग आली. त्यामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. या घटनेनंतर तिने मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून फिरोजविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ७४ भारतीय न्याय संहिता सहकलम ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सायंकाळी पळून गेलेल्या फिरोजला पोलिसांनी अटक केली.

दुसरी घटना विलेपार्ले परिसरात घडली. १७ वर्षांची मुलगी रविवारी पावणेदहा वाजता मॉर्निंक वॉक करुन घरी जात होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने वेगवेगळे प्रकारचे आवाज काढून तिचे लक्ष स्वतकडे वेधण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला पाहिल्यानंतर त्याने अश्‍लील चाळे करुन तिला बोलण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने ही मुलगी प्रचंड घाबरली आणि तिने जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलीस उपनिरीक्षक महिलेने अज्ञात व्यक्तीविरुद्ध ७९ भारतीय न्याय सहिता सहकलम १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page