सतरा वर्षांच्या मुलीचा अश्‍लील मॅसेज पाठवून विनयभंग

खाजगी शिकवणी घेणार्‍या आरोपी शिक्षकाला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – स्वतच्याच सतरा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला तिच्याच खाजगी शिकवणी घेणार्‍या शिक्षकाने सोशल मिडीयावर अश्‍लील मॅसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याची घटना ठाकूरद्वार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी या मुलीच्या तक्रारीवरुन एल. टी मार्ग पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून ३० वर्षांच्या आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.

सतरा वर्षांची तक्रारदार मुलगी ही ठाकूरद्वार परिसरात राहते. ती सध्या एका नामांकित कॉलेजमध्ये शिकते. आरोपी व्यवसाायने खाजगी शिक्षक असून ती कॉमर्स विषयाचे खाजगी शिकवणी घेणार्‍या त्याच्याकडे जात होती. १९ ऑक्टोंबरला ही मुलगी घरात असताना तिला तिच्या शिक्षकाने इंटाग्रामवरील आयडीवरुन एक मॅसेज पाठविला होता. त्यात त्याने अश्‍लील संभाषण करुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. हा मॅसेज पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगून शिक्षकाविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत गुरुवारी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी एल. टी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खाजगी क्लासेसमध्ये शिकवणीसाठी जाणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर क्लासेसच्या तिन्ही संचालक बंधूूनी लैगिंक अत्याचार करुन तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच तिन्ही बंधूंना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ही घटना ताजी असताना एका सतरा वर्षांच्या मुलीला तिच्याच खाजगी शिक्षकांने अश्‍लील मॅसेज पाठविल्याने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे आरोपी प्रसाद हादेखील ठाकूरद्वार परिसरात राहत असून तो खाजगी शिकवणी घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page